२४ जानेवारी २०२०

आंध्रप्रदेश राज्याच्या तीन राजधानी असणार.

🔰आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी तयार केलेल्या तीन राजधानींच्या विधेयकाला 20 जानेवारी 2020 रोजी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात मंजूरी देण्यात आली.

🔰नव्या विधेयकानुसार, आंध्रप्रदेशची प्रशासकीय राजधानी विशाखापट्टणम, न्यायालयीन राजधानी कर्नूल, तर विधिमंडळ राजधानी अमरावती असणार आहे.

🔰अमरावती या शहरात विधीमंडळाचे कामकाज ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

🔰तीन शहरांना राजधानीचा दर्जा देण्याचा देशातला हा पहिलाच प्रयोग असण्याची शक्‍यता आहे.

🔰राज्यातल्या प्रशासनाचे विकेंद्रीकरण आणि सर्वकष विकास विधेयक विधानसभेत सादर करण्यात आले. चर्चेअंती आवाजी मतदानाने ते विधेयक मंजूर करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...