Sunday, 5 January 2020

असहकार आंदोलनाचा प्रसार व व्याप्ती

* गांधीजींनी खिलाफत चळवळीचे नेते अली बंधूसोबत
देशव्यापी दौरा केला.

सरकारी शाळांवर बहिष्कार -

अंदाजे ९०,०००
विद्यार्थ्यांनी सरकारी शाळा-कॉलेजेस सोडून
नवनिर्मित ८०० राष्ट्रीय शाळा व महाविद्यालयात
प्रवेश घेतला. बंगालमध्ये चित्तरंजन दास यांनी
प्रमुख भूमिका बजावली. सुभाषचंद्र बोस कलकत्ता
येथील राष्ट्रीय महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.
राष्ट्रीय शाळांच्या स्थापनेत सहभागी नेतृत्व होते
आचार्य नरेंद्र देव, लाला लजपतराय, झार्ीर हुसेन
इ. याशिवाय अलिगढची जामिया मिलिया, काशी
विद्यापीठ, गुजरात विद्यापीठ व बिहार विद्यापीठ
यांचाही लक्षणीय सहभाग होता.
वकिली व्यवसायाचा त्याग करणारे नेते - चित्तरंजन
दास, मोतीलाल नेहरू, मुकूंदराव जयकर, सैफुद्दीन
किचलू, वल्लभभाई पटेल, सी. राजगोपालाचारी, टी.
प्रकाशम, असफ अली व राजेंद्र प्रसाद इ.

🌺परदेशी कापडांवर बहिष्कार 🌺

- हा असहकारातील
सर्वाधिक यशस्वी कार्यक्रम ठरला. परदेशी कपड्यांची
सार्वजनिक होळी करण्यात येई. ते विकणाऱ्या
दुकानांसमोर निदर्शने करत. १०२ कोटी रुपयांची
कपड्यांची आयात १९२१-२२ मध्ये ५७ कोटी
रुपयांपर्यंत खाली आली.

☘☘☘☘☘🌸🌸☘☘☘☘☘☘

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...