Wednesday, 1 January 2020

रशियाकडे जगातील पहिली हायपरसोनिक मिसाईल

🎆 रशियाने आज आवाजाच्या वेगापेक्षा 27 पटींनी जास्त वेगवान असलेल्या हायपरसोनिक मिसाईलला त्यांच्या सैन्यदलाकडे सुपूर्द केले आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतीन यांनी याची घोषणा केली आहे. ही मिसाईल अण्वस्त्र क्षमता ठेवते.

🎆 तर या हायपरसोनिक मिसाईलचा वेगच एवढा प्रचंड आहे की त्याच्याशी कोणतीच डिफेन्स प्रणाली टक्कर देऊ शकत नाही. 

🎆 27 डिसेंबरला ही मिसाईल रशियन सैन्याला देण्यात आली. या मिसाईलची तैनाती कुठे असेल याबाबत कोणतीही माहिती नसून यूरलच्या डोंगररांगांमध्ये ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

🎆 हायपरसोनिक मिसाईल आवाजाच्या वेगापेक्षा (1235 किमी) कमीत कमी 5 पटींनी जास्त वेगाने जाऊ शकते. म्हणजेच 6174 प्रति तास वेग. या मिसाईलमध्ये क्रूझ आणि बॅलिस्टिक मिसाईल या दोन्हींचे गुण आहेत.

🎆 तसेच हे मिसाईल लाँच झाल्यानंतर पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाणार आहे. त्यानंतर तेथून अंतर कापत लक्ष्याकडे झेपावणार आहे. यामुळे या मिसाईलला रोखणे कठीण असणार आहे. वेगही प्रचंड असल्याने सध्याचे रडार या मिसाईलला शोधण्यात कुचकामी ठरणार आहेत.

🎆 तर या मिसाईलची धक्कादायक बाब म्हणजे हे मिसाईल तब्बल दोन अब्ज किलो अण्वस्त्र वाहून नेऊ शकते. यामुळे एखादा मोठा देश काही क्षणांत बेचिराख होऊ शकतो.

🎆 या मिसाईलच्या टप्प्यात अमेरिकाही येते. 2018 मध्ये या मिसाईलची टेस्टिंग करण्यात आली होती. तेव्हा 6000 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...