Sunday, 5 January 2020

गगनयान मोहिमेसाठी चार जणांची निवड.

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख के सिवन यांनी चांद्रयान-3 आणि गगनयान मोहिमेची घोषणा केली आहे.

📌गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याची माहिती यावेळी बोलताना त्यांनी दिली.

📌बंगळुरुत के सिवन यांनी पत्रकार परिषद घेत इस्रोच्या आगामी मोहिमा आणि योजनांबद्दल माहिती दिली. गगनयान 2020 पर्यंत अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा मानस आहे.

📌गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात होईल.

📌रशियामध्ये हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.तर यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे.

📌2019 मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,
2022 पर्यंत गगनयान अंतराळात पाठवण्याचा इस्रोचा निर्धार आहे. या मोहिमेअंतर्गत चारही अंतराळवीरांना सात दिवसांसासाठी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. ही मोहीम इंडियन ह्युमन स्पेसफाइट प्रोगामचा भाग आहे.

📌गगनयानमधील अनेक तांत्रिक गोष्टींची तपासणी करणं आवश्यक असून, अंतराळवीरांचं प्रशिक्षण यावर्षींची सर्वात
मोठी घडामोड असणार असल्याचं के सिवन यांनी सांगितलं.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...