Wednesday, 22 January 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच


(4) कोणत्या खेळाडूने रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले?
(1)बबिता कुमारी
(2)विनेश फोगट✅✅
(3)साक्षी मलिक
(4)लुईसा एलिझाबेथ वाल्व्हर्डे

⚛⏩SOLUTION ⏩रोममध्ये झालेल्या रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगट हिने 53 किलोग्रॅम वजनी गटाचे सुवर्णपदक जिंकले. बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले.

(5) शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची 19 वी परिषद कोणता देश आयोजित करणार आहे?
(1)भारत✅✅
(2)रशिया
(3)चीन
(4)कझाकस्तान

⚛⏩Solution ⏩2020 साली होणार्‍या शांघाय सहकार्य संघटना (SCO) यांच्या सरकारांच्या प्रमुखांची (पंतप्रधानांची) 19 वी परिषद भारत देश आयोजित करणार आहे. शांघाय सहकार्य संघटना (Shanghai Cooperation Organisation -SCO) याची स्थापना 2001 साली झाली आणि त्याचे मुख्यालय चीनच्या बिजींग या शहरात आहे. SCO मध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उज्बेकिस्तान, भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश आहे.  चीन हा याचा संस्थापक देश आहे.

(6)कोणत्या राज्यात प्रथम ‘कृषी मंथन’ (अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातली सर्वात मोठी शिखर परिषद) सुरू झाली?
(1) तेलंगणा
(2) आसाम
(3) दिल्ली
(4) गुजरात✅✅

⚛⏩Solution ⏩गुजरातच्या IIM अहमदाबाद यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रथम ‘कृषी मंथन’ या अन्न, कृषी-व्यवसाय आणि ग्रामीण विकास विषयक आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या शिखर परिषदेला सुरूवात झाली.

(7) कोणत्या शहरात इंधनाच्या संवर्धनासाठी PCRAच्या 'सक्षम 2020' नावाच्या जागृती मोहीमेला सुरूवात करण्यात आली?
(1)बेंगळुरू
(2)हैदराबाद
(3)नवी दिल्ली✅✅
(4)लखनऊ

⚛⏩Solution ⏩पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने पेट्रोलियम संवर्धन संशोधन संघटनेकडून (PCRA) ‘सक्षम’ नावाने इंधन बचतीविषयी महिन्याभराची लोक-केंद्रित मोहीम राबवली जात आहे. 16 जानेवारी 2020 रोजी दिल्लीमध्ये या मोहिमेचे उद्घाटन झाले.

(8)29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
(1)के. शिव रेड्डी
(2)ममता कालिया
(3)वासदेव मोही✅✅
(4)यापैकी नाही

⚛⏩SOLUTION ⏩सिंधी लेखक वासदेव मोही ह्यांना त्यांच्या ‘चेकबुक’ शीर्षक असलेल्या कथासंचासाठी 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार देण्यात आला. सरस्वती सन्मान के. के. बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिला जातो.

(9) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
(1)दक्षिण आफ्रिका✅✅✅
(2)भारत
(3)ऑस्ट्रेलिया
(4)न्युझीलँड

⚛⏩SOLUTION ⏩‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवली जात आहे. ही स्पर्धा 17 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत चालणार आहे.

(10) कोणत्या व्यक्तीची पुढील तीन वर्षांसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)मायकेल देबाब्रत पात्रा✅✅
(2)विरल आचार्य
(3)एस. एस. मुंद्रा
(4)एच. आर. खान

⚛⏩SOLUTION ⏩भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. शक्तिकांत दास हे वर्तमान RBI गव्हर्नर आहेत. RBIचे इतर तीन डेप्युटी गव्हर्नर - एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन.

⚛⚛ ____________ येथे ‘राष्ट्रीय आदिवासी युवा विनिमय कार्यक्रम’ याला सुरुवात झाली.

(A) पुडुचेरी✅✅
(B) रांची
(C) नवी दिल्ली
(D) रायपूर

⚛⚛नुकतेच निधन झालेले रॉकी जॉनसन हे कोणत्या खेळाशी संबंधित होते?

(A) कुस्ती✅✅
(B) फुटबॉल
(C) क्रिकेट
(D) हॉकी

⚛⚛2019 या सालासाठी जल-विषयक कार्यक्षमतेच्या ध्येयावर आधारित असलेला केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा विभागांच्या क्रमवारीतेमध्ये कोणते राज्य अव्वल ठरले?

(A) दिल्ली
(B) गुजरात✅✅
(C) मध्यप्रदेश
(D) राजस्थान

शिव केंद्रे:
⚛⚛....यांनी 1929 ते 1944 दरम्यान मद्रास प्रांताचे अँडव्होकेट जनरल म्हणून कार्य केले होते.
1)एन गोपालस्वामी अय्यंगार
2)अल्लादि कृष्णस्वामी अय्यर✅✅
3)स द मुहम्मद सादुल्लाह
4)डॉ के एन मुन्शी

Pratiksha M:
⚛⚛कोणत्या राज्यात “परशुराम कुंड मेळावा’ या उत्सवाला सुरुवात झाली?
(1)हिमाचल प्रदेश
(2)उत्तराखंड
(3)अरुणाचल प्रदेश✅✅
(4)त्रिपुरा

⚛⚛कोणत्या व्यक्तीची केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
(1)ए. पी. माहेश्वरी✅✅
(2)एस. एस. देसवाल
(3)राजीव राय भटनागर
(4)रजनी कांत मिश्रा

⚛⚛⏩Solution ⚛केंद्रीय IPS अधिकारी ए. पी. माहेश्वरी ह्यांची 13 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) महानिदेशक म्हणून नियुक्ती करण्यात आली. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. 31 डिसेंबर 2019 रोजी आर. आर. भटनागर निवृत्त झाल्यानंतर CRPF महानिदेशक हे पद रिक्त होते.

⚛⚛कोणत्या स्थळाचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे?
(1)स्टॅच्यू ऑफ युनिटी✅✅
(2)कॅपिटल कॉम्प्लेक्स
(3)अजिंठा लेणी
(4)बॅसिलिका ऑफ बॉम जिझस

⚛⏩SOLUTION ⏩जगातला सर्वात उंच पुतळा म्हणजेच गुजरातमधले ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ याचा शंघाई सहकार संघटना (SCO) यांच्या '8 वंडर्स ऑफ SCO' या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. इतर सात आश्चर्य - तमगलीचा भूप्रदेश (Archaeological Landscape of Tamgaly), कझाकस्तान; डॅमिंग पॅलेस, चीन; इसिक-कुल तलाव, किर्गिस्तान; मुघल घराण्याचा वारसा, पाकिस्तान; गोल्डन रिंग, रशिया; कोही नवरोझ पॅलेस, ताजिकिस्तान आणि बुखाराचे ऐतिहासिक केंद्र, उझबेकिस्तान

⚛⚛______ येथे ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ आहे ?
(1)गुवाहाटी✅✅
(2)इंफाळ
(3)कोहिमा
(4)कोलकाता

⚛⚛SOLUTION ⏩आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ (CBTC) ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...