Saturday, 4 January 2020

‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात लवकरच

​​
◾️संपूर्ण भारतीय बनावटीच्या, अद्ययावत अशा ‘आय.एन.एस. खांदेरी’ पाणबुडीच्या सर्व चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या असून २८ सप्टेंबरला ती नौदलाच्या ताफ्यात दाखल होईल.

◾️ कलवरी श्रेणीतील ही दुसरी पाणबुडी असून डिझेल-विद्युत प्रकारातील सर्वात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये करण्यात आला आहे.

◾️ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईतील गोदीत ‘खांदेरी’ नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल होईल.

◾️कलवरी श्रेणीतील सहा पाणबुडय़ा बांधण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला होता. त्याअंतर्गत ही दुसरी पाणबुडी नौदलात दाखल होत आहे.

◾️ पी १७ प्रकल्पांतर्गत बांधण्यात येणाऱ्या ‘स्कॉर्पिअन’ या फ्रेंच तंत्राधारित उर्वरित चार पाणबुडी २०२३ पर्यंत नौदलात दाखल होतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

◾️ ‘खांदेरी’च्या बांधणीचे काम एप्रिल २००९ मध्ये सुरू करण्यात आले, मध्यंतरी काही काळ फ्रेंच उत्पादकांच्या पुरवठा साखळीतील अडचणींमुळे बांधणीस काही काळ विलंब झाला.

◾️‘पर्मासिन मोटार’ या अद्ययावत तंत्राचा वापर केल्यामुळे ही पाणबुडी समुद्रातून जात असताना तिचा आवाजच येणार नाही. परिणामी शत्रूला चकवा देणे शक्य होईल असा विश्वास नौदल अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

◾️ त्याचबरोबर अंतर्गत यंत्राचा आवाज बाहेर जाणारच नाही अशी यंत्रणादेखील यामध्ये कार्यरत आहे. खांदेरीवरील यंत्रणा स्वयंचलित आहे,  त्यामुळे नौसैनिक-अधिकाऱ्यांची आवश्यकता निम्माने कमी झाली आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराने मनुष्यबळ निम्म्यावर

◾️ ३६० बॅटरींचा वापर (प्रत्येकी ७५० किलो वजन)

◾️ पर्मासिन मोटरच्या वापरामुळे आवाजच नाही

◾️ ४ पाणतीर (टॉर्पेडो), २ क्षेपणास्त्रे डागण्याची यंत्रणा

◾️ ताशी २० नॉटिकल मैल वेगाने जाण्याची क्षमता

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...