🍬- ‘मानवी अंतराळ मोहीम आणि शोध’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान ‘व्योममित्र’ या नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवाचे अनावरण करण्यात आले.
🍬- भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ या अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) चालणारा व्योममित्र अंतराळात मानवी शरीराच्या हालचालींचा अभ्यास करणार असून त्यासंबंधीचा तपशील पाठविणार आहे. व्योममित्र एक अत्यंत विशेष रोबो असून तो बोलू शकतो तसेच व्यक्तींची ओळख पटवू शकतो.
- गगनयान मोहीम
🍬गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम तीन टप्प्यांची आहे.
भारताच्या पहिल्या मानवी अंतराळ मोहिमेची पूर्वतयारी म्हणून डिसेंबर 2020 या महिन्यात पहिली निर्मनुष्य अंतराळ मोहीम हाती घेतली जात असून तशीच दुसरी मोहीम जून 2021 या महिन्यात होणार आहे. त्यानंतर 2021 साली भारताचे अंतराळवीर ‘गगनयान’ मोहिमेतून अंतराळात पाठवले जाणार आहेत.
🍬- मानवी अंतराळ मोहिमेसाठी ISROने 10 टनांचे वजन वाहून नेऊ शकेल असा प्रक्षेपक तयार केला आहे.
भारताच्या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यापूर्वी ‘व्योममित्र’ (व्योम म्हणजे अंतराळ) नावाने भारतात तयार करण्यात आलेल्या स्त्री अर्धयंत्रमानवास (half-humanoid) गगनयानाच्या पहिल्या निर्मनुष्य मोहिमेत अंतराळात पाठवले जाणार आहे. या अंतराळ मोहिमेत मी विविध घटकांचे निरीक्षण करून व्योममित्र इतरांना सतर्क करणार आहे. जीवनपूरक कृतींचे परीक्षण यात केले जाणार आहे. माणसाने अंतराळात करण्याच्या कृतींची नक्कल हा यंत्रमानव करू शकतो.
No comments:
Post a Comment