Wednesday, 22 January 2020

आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर.

🎆 आंध्र प्रदेशात विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिकेसाठी तीन वेगवेगळ्या राजधान्या असणार आहेत.

🎆 सर्व क्षेत्रांच्या विकासासाठी आंध्र प्रदेश विधानसभेनं विकेंद्रीकरण आणि समावेशन विकास विधेयक काल रात्री मंजूर केलं.

🎆 या विधेयकानुसार विशाखापट्टणम कार्यपालीकेची, तर अमरावती विधिमंडळाची आणि कुर्नुल न्यायपालिकेची राजधानी प्रस्तावित आहे. 

🎆 राज्याचे विविध विभाग पाडण्याची तरतूद या विधेयकात आहे. विभागीय योजना आणि विकास मंडळं स्थापन करणं हा यामागचा उद्देश आहे.

🎆 आज हे विधेयक आंध्रप्रदेशाच्या विधानपरिषदेत मांडलं जाईल. ५८ सदस्य असलेल्या विधानपरिषदेत सत्ताधारी पक्षाचे केवळ ९ सदस्य असल्यामुळे हे विधेयक मंजूर करून  घेणं हे सरकारपुढचं आव्हान आहे. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...