Saturday, 4 January 2020

अंधांचे प्रकाशदूत : ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल

💁‍♂ अंध व्यक्तींसाठी बोटांच्या सहाय्याने वाचनाची पद्धत/लिपी विकसित करणाऱ्या लुई ब्रेल यांचा आज जन्मदिन.

👉 फ्रान्समधल्या  एका छोट्याशा गावात एका मध्यमवर्गीय कुटुंबात 4 जानेवारी 1809 या दिवशी लुई ब्रेल यांना जन्म झाला. लुई तीन वर्षांचे झाले आणि अचानक एका अपघातात त्यांची दृष्टी गेली.

👉 वयाच्या तिसर्‍या वर्षी लुई कायमचे अंध झाले परंतु ते खचले नाही तीक्ष्ण बुध्दीमत्तेच्या लुई ब्रेलने रात्रंदिवस प्रयोग करून, संशोधन करून, कठोर परिश्रमाने वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी एक अशी लिपी शोधून काढली होती की ज्यामुळे अंध व्यक्ती केवळ बोटांच्या स्पर्शाने अक्षरे वाचू शकेल. ज्या लिपीमुळे अंधांना वाचता येऊ लागले. त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडे झाले ती लिपी म्हणजे “ब्रेल लिपी” होय.

👉 लुई ब्रेल वयाच्या सतराव्या वर्षी सातवी, आठवीतल्या अंध मुलांना स्वत:च शोधलेल्या ब्रेल लिपित वाचायला शिकवत असे. इतिहास, भूगोल, गणित, फ्रेंच, ग्रीक, संगीत असे अनेक विषय लुई शिकवत असे.

👉 लुई यांनी ब्रेल लिपित अनेक पुस्तके लिहिली. ते विद्यार्थ्यांचे अत्यंत आवडते शिक्षक होते, पण दुर्देवाने त्यांना क्षय झाला. त्यांच्या 43 व्या वाढदिवसानंतर अवघ्या दोनच दिवसांनी 6 जानेवारी 1852 ला ते मरण पावले.

👉 आज वापरली जाणारी ब्रेल लिपी सोपी व अत्यंत सोयीची असल्यामुळे लाखो अंधांच्या काळोख्या जगात ज्ञानाचा प्रकाश उगवला आहे; अर्थात हे सर्व, २०० वर्षांआधी एका कर्तबगार तरुणाने केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच शक्य झाले!

👉 4 जानेवारी 2009 या दिवशी भारत सरकारने लुई ब्रेलच्या सन्मानार्थ पोस्टाचं तिकीट काढून त्यांच्या कार्याचा गौरव केला. लुई ब्रेल यांचा जन्मदिवसानिमित्त संपूर्ण जगात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा होतो.

No comments:

Post a Comment