Saturday, 18 January 2020

हर्नाडेझ बार्सिलोनाचा मुख्य प्रशिक्षक

🌀स्पेनला २०१०च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा मातब्बर खेळाडू आणि बार्सिलोनाचा माजी कर्णधार हॅव्हिएर हर्नाडेझ लवकरच बार्सिलोनाच्याच मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता बळावली आहे. सध्या कतार प्रीमियर लीगमध्ये अल-साद संघाला मार्गदर्शन करणाऱ्या हर्नाडेझच्या भवितव्याविषयी स्वत: क्लबच्या अधिकाऱ्यांनीच माहिती दिली आहे.

🌀बार्सिलोनाचे सध्याचे प्रशिक्षक इर्नेस्टो व्हॅलवरेड यांची लौकिकाला साजेशी कामगिरी न झाल्यामुळे हर्नाडेझकडे प्रशिक्षकपद सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. विशेषत: स्पॅनिश सुपर चषकातील उपांत्य फेरीत अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्ध पराभव पत्करल्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

🌀‘‘हर्नाडेझ बार्सिलोनाच्या मुख्य प्रशिक्षकपदी विराजमान होण्याच्या चर्चाना गेल्या काही दिवसांपासून उधाण आले आहे. परंतु तूर्तास तरी अल-साद संघासोबतचा त्याचा करार संपलेला नाही,’’ असे अल-साद क्लबचे क्रीडा संचालक मोहम्मद गुलाम अल-बलुशी म्हणाले. मात्र याविषयी अंतिम निर्णय दोन्ही संघांच्या व्यवस्थापनाचा असेल, असेही अल-बलुशी यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment