Friday, 24 January 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच

(1)ISRO इनसॅट-4ए उपग्रहाला बदलण्यासाठी _ याचे प्रक्षेपण करणार आहे जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे ?
(1)जीसॅट-31
(2)जीसॅट-30✅✅
(3)जीसॅट-7ए
(4)जीसॅट-29
⚛⏩⚛solutions ⏩ISROच्या इनसॅट-4ए उपग्रहाला बदलण्यासाठी जीसॅट-30 उपग्रह अंतराळात पाठविण्यात येणार आहे, जे दूरसंचार, हवामानशास्त्र, प्रसारण इत्यादींसाठी भूस्थिर उपग्रहांच्या शृंखलेतले एक आहे. 17 जानेवारी 2020 रोजी हा उपग्रह एरियानस्पेस या युरोपीयन एरोस्पेस कंपनीच्या सहकार्याने फ्रेंच गुयानामधील प्रक्षेपण केंद्रावरून प्रक्षेपित केला जाणार आहे.
 

(2)______ येथे ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ आहे ?
(1)गुवाहाटी✅✅
(2)इंफाळ
(3)कोहिमा
(4)कोलकाता
⚛⏩Solution ⏩⏩आसामच्या गुवाहाटी या शहरात असलेले ‘केन व बांबू तंत्रज्ञान केंद्र’ (CBTC) ईशान्य परिषदेच्या अंतर्गत कार्य करते.

(3)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 150 व्या वर्धापनदिनानिमित्त कोलकाता पोर्ट ट्रस्टचे नामकरण केले. हे नामकरण कोणाच्या नावावरून झाले आहे ?
(1)श्यामा प्रसाद मुखर्जी✅✅
(2)अटलबिहारी वाजपेयी
(3)स्वामी विवेकानंद
(4)नेताजी सुभाषचंद्र बोस
⚛⏩⚛Solution ⏩पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी 2020 रोजी कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150 व्या वर्धापनदिन सोहळ्यात सहभागी झाले. पंतप्रधानांनी कोलकाता पोर्ट ट्रस्टचे श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट असे नामकरण केले. डॉ. श्यामा मुखर्जी यांनी देशातल्या औद्योगिकीकरणाची पायाभरणी केली आणि चितरंजन लोकोमोटिव्ह फॅक्टरी, हिंदुस्तान एअरक्राफ्ट फॅक्टरी, सिंदरी फर्टिलायझर फॅक्टरी आणि दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन यासारख्या प्रकल्पांच्या विकासात मोलाची कामगिरी बजावली.

(4)बाह्य अंतराळ क्षेत्रात संशोधन करण्यासाठी भारत कोणत्या देशासोबत एक संयुक्त कार्य गट स्थापना करणार आहे?
(1)मंगोलिया✅✅
(2)सिंगापूर
(3)जापान
(4)फ्रान्स
⚛⏩Solution ⏩8 जानेवारी 2019 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि मंगोलिया यांच्यात बाह्य अंतराळाचा वापर आणि संशोधन कार्यात शांतिपूर्ण आणि नागरी उद्देशाने सहकार्य करण्याच्या करारास मान्यता दिली. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारत दौऱ्यादरम्यान 20 सप्टेंबर 2019 रोजी नवी दिल्लीत या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या कराराच्या अंतर्गत, उभय पक्ष एक संयुक्त कार्य गट तयार करण्यास सक्षम असणार ज्यामध्ये भारत सरकारचे अंतराळ विभाग आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) आणि मंगोलियाच्या कम्युनिकेशन्स अँड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी अथॉरिटी या संस्थांच्या सदस्यांचा समावेश असणार आहे. हा कार्य गट कराराच्या व्यवस्थेची अंमलबजावणी करण्याच्या पद्धती आणि त्यांच्यासाठी कालावधी निश्चित करणार.

(5)'सुकन्या' प्रकल्प हा _______ विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी चालू केलेला उपक्रम आहे ?
(1)कोलकाता पोलीस✅✅✅
(2)राजस्थान पोलीस
(3)मुंबई पोलीस
(4)दिल्ली पोलीस
⚛⏩SOLUTION ⏩कोलकाता पोलीस विभागाने विद्यार्थिनींना आत्मरक्षणासाठी प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी चालू केलेल्या 'सुकन्या' प्रकल्पाच्या तृतीय आवृत्तीला 6 जानेवारी 2020 पासून आरंभ केला आहे.

(6)ISRO या संस्थेनी _________ येथे ‘ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC)’ उभारण्यासाठी 2,700 कोटी रूपये खर्च असलेल्या योजनेचा आराखडा तयार केला आहे?
(1)बेंगळुरू
(2)तिरुवनंतपुरम
(3)छल्लाकेरे✅✅
(4)कोची
⚛⏩Solution ⏩⏩अंतराळवीरांना मोहिमेसाठी सज्ज करण्याच्या हेतूने त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) कर्नाटक राज्यातल्या छल्लाकेरे या गावाजवळ जागतिक दर्जाची सुविधा देणार एक प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. कर्नाटकातल्या चित्रदुर्गा जिल्ह्यात बेंगळुरू-पुणे NH4 वरील छल्लाकेरे या गावाजवळ हे केंद्र उभारले जाणार आहे. हा प्रकल्प येत्या तीन वर्षांत पूर्ण केला जाणार आहे. ISROने या प्रकल्पासाठी 2,700 कोटी रुपयांचा एक आराखडा तयार केला आहे. या केंद्रामध्ये अत्याधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तसेच तेथे ‘योंग ह्यूमन स्पेस फ्लाइट सेंटर’ देखील तयार केले जाणार.

(7) कोणत्या शहरात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन होणार आहे?
(1)कटक
(2)भुवनेश्वर✅✅
(3)भोपाळ
(4)गुवाहाटी
⚛⏩SOLUTION⏩⏩भुवनेश्वर (ओडिशा) या शहरातल्या KIIT विद्यापीठात प्रथम ‘खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स’चे 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत आयोजन केले जाणार आहे.
 

(8)जाहीर झालेला ‘अर्थशॉट पारितोषिक’ ________ शी संबंधित आहे ?
(1)दहशतवाद
(2)हवामानातले बदल✅✅
(3)लोन वुल्फ अटॅक
(4)क्रिप्टोकरन्सी
⚛⏩SOLUTION⏩⏩ब्रिटनच्या ड्यूक अँड डचेस ऑफ केंब्रिज या संस्थेनी त्यांच्या ‘अर्थशॉट पारितोषिक’ यांची घोषणा केली आहे. हे पुरस्कार हवामानातल्या बदलांच्या दिशेनी पृथ्वीवरील पर्यावरण सुधारण्यासाठी दशकभर केलेल्या कार्यांसाठी व्यक्ती वा संस्थेला दिले जाणार आहेत. हे पुरस्कार वर्ष 2021 ते वर्ष 2030 या काळात दरवर्षी पाच विजेत्यांना दिले जाणार आहेत.
 

(9)दुसरी ‘तेजस’ रेलगाडी _________ या शहरांच्या दरम्यान धावणार आहे ?
(1)मुंबई आणि ठाणे
(2)अहमदाबाद आणि मुंबई✅✅✅
(3)लखनऊ आणि दिल्ली
(4)चेन्नई आणि त्रिची
⚛⏩SOLUTION⏩⏩IRCTC कंपनीची दुसरी खासगी ‘तेजस’ रेलगाडी अहमदाबाद आणि मुंबई या शहरांच्या दरम्यान धावणार आहे.

(10) कोणत्या प्रकल्पासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतीय खगोलशास्त्र संस्था (IIA) सोबत करार केला ?
(1)चंद्रयान-3
(2)नेत्र✅✅
(3)आदित्य एल-1
(4)गगनयान
⚛⏩SOLUTION⏩⏩“प्रोजेक्ट नेत्र (NETRA)” अंतर्गत एक अंतराळ दुर्बिण तयार करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) भारतीय खगोलशास्त्र संस्था (IIA) सोबत करार केला आहे.

राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
(1)20 जानेवारी
(2)19 जानेवारी
(3)18 जानेवारी✅✅
(4)26 जानेवारी
⚛⏩SOLUTION ⏩⏩18 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) यांचा 15 वा उदय दिवस साजरा करण्यात आला. NDRFची स्थापना 2006 साली झाली. ‘आपत्ती व्यवस्थापन कायदा-2005’ अन्वये या दलाची स्थापना झाली. हे दल गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत कार्य करते. संकटकाळात शास्त्रोक्त पद्धतीने संकटाचे निवारण करण्याच्या उद्देशाने नेमलेले हे एक विशेष दल आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDRM) हे भारताचे आपत्ती व्यवस्थापनासाठीचे प्रमुख मंडळ आहे आणि पंतप्रधान त्याचे अध्यक्ष असतात.
@allpaperinformation

⚛⚛कोणते राज्य 6 मार्च 2020 रोजी ‘चपचार कुट’ महोत्सव साजरा करणार?
(1)नागालँड
(2)मणीपूर
(3)मिझोरम✅✅✅
(4)पश्चिम बंगाल
⚛⏩⏩6 मार्च 2020 रोजी मिझोरम राज्यात ‘चपचार कुट’ महोत्सवाचे आयोजन केले जाणार आहे. हा मिझोरमचा सर्वात मोठा आणि महत्वाचा उत्सव आहे.
 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...