Wednesday, 22 January 2020

केंद्रशासित जम्मू आणि कश्मीर प्रदेशातली प्रीपेड मोबाईल सेवा सुरू.

🎆 जम्मू-कश्मीर या नवनिर्मित केंद्रशासित प्रदेशात कालपासून प्रीपेड मोबाईल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.

🎆 काश्मीर खोर्‍यात दोन जिल्ह्यातील टू-जी सेवाही सुरू झाली असल्याची माहिती अधिकृत प्रवक्ते रोहित कन्सल यांनी दिली.

🎆 या सेवा गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून बंद ठेवण्यात आल्या होत्या.

🎆 या प्रदेशात सर्वत्र एस.एम.एस सेवाही सुरू झाली आहे. मोबाईल सिमद्वारे इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी ग्राहकांची ओळख पटवण्याचं काम मोबाईल सेवा कंपन्यांनी करायचं आहे.

🎆 ही सेवा जम्मू विभागातल्या सर्व दहा आणि कूपवाडा आणि बांदिपूर या काश्मीर खोर्‍यातील जिल्ह्यांमधे दिली जात आहे. 

🎆 ५ ऑगस्ट २०१९ ला संविधानाच्या ३७० कलमाच्या दुरूस्तीद्वारे जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा रद्द होऊन राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमधे विभाजन झाल्यानंतर या सेवा थांबवण्यात आल्या होत्या.

🔹

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...