Wednesday, 22 January 2020

भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन आज दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते संयुक्तरित्या होणार

🎆 भारत-नेपाळ सीमेवरच्या बिराटनगर एकात्मिक तपासणी चौकीचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नेपाळचे प्रधानमंत्री के. पी. शर्मा ओली यांच्या हस्ते संयुक्तरित्या आज होणार आहे.

🎆 उभय देशांचे प्रधानमंत्री आज सकाळी अकरा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या प्रकल्पाचं उदघाट्न करतील. 

🎆 भारत आणि नेपाळदरम्यान एक हजार ८५० किलोमीटरची सीमारेषा आहे. दोन्ही देशातून नागरिकांची ये-जा सुरु असते.

🎆 यासह जोगबनी-विराटनगर आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र दोन्ही देशांमधल्या व्यापाराचं महत्वाचं स्थान आहे. 

🎆 २६० एकर जागेवर १४० कोटी रुपये खर्च करून ही तपासणी चौकी उभारली आहे.

🎆 परदेशी नागरिकांसाठी इमिग्रेशन व्यवस्था, मालाच्या आयात निर्यातीसाठी सुविधा या चौकीमध्ये आहेत. दररोज सुमारे ५०० ट्रक येतील अशी व्यवस्था यात केलेली आहे. 

🎆 नेपाळमध्ये भूकंपानंतर भारताच्या मदतीनं सुरु असलेल्या घर पुनर्निर्माण प्रकल्पाच्या प्रगतीचा नरेंद्र मोदी आणि के. पी. ओली आढावा घेतील.

🎆 नेपाळच्या गोरखा आणि नुवाकोट जिल्ह्यात पन्नास हजार घरं बांधण्यासाठी  भारतानं नेपाळला आर्थिक मदत दिली आहे. या प्रकल्पाअंतर्गत ९१ टक्के घरं बांधून पूर्ण झाली आहेत. 

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...