Saturday, 18 January 2020

रशिया २०२५ पर्यंत भारताला देणार एस - ४०० हवाई सुरक्षा यंत्रणा.

🔰 भारतासाठी तयार केल्या जाणार्‍या, जमिनीवरून हवेत मारा करू शकणाऱ्या लांब पल्ल्याच्या एस ४०० या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीला रशियानं सुरुवात केली आहे.

🔰 ही क्षेपणास्त्र २०२५ पर्यंत भारताकडे सुपूर्द केली जातील अशी माहिती या मोहिमेचे रशियाचे उप प्रमुख रोमन बाबुश्किन यांनी काल नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली. 

🔰 याशिवाय सैनिकी वापरासाठीच्या कामोव्ह या हलक्या हेलिकॉप्टर्सच्या संयुक्त निर्मिती कराराला लवकरच अंतिम रूप दिलं जाईल, असं ते म्हणाले.

🔰 रशिया यावर्षी भारताला पाच हजार कलाश्निकोव्ह राइफली देणार आहे, असं त्यांनी सांगितलं. 

🔰 एस ४०० हवाई सुरक्षा क्षेपणास्त्र प्रणाली जगातल्या सर्वोत्तम यंत्रणेपैकी एक आहे, यामुळे भारताची हवाई सुरक्षा अधिक मजबूत होईल असं बाबुश्किन म्हणाले.

🔰 भारत आणि रशिया यांच्या २०१८ मध्ये यासंबंधीचा पाच अब्ज डॉलर्स चा करार झाला होता.   

No comments:

Post a Comment