Friday, 24 January 2020

वाराणसीत बनलं नेताजींचं देशातलं पहिलं मंदिर

📌पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं देशातलं पहिलं मंदिर तयार झालं आहे.

📌वरुणापार येथील सुभाष भवन मध्ये बनलेल्या या मंदिराचं उद्घाटन नेताजींच्या १२३ व्या जयंती दिनी २३ जानेवारीला होणार आहे. या मंदिराचे पुजारी दलित समाजातील रणधीर कुमार असणार आहेत.

📌विशाल भारत संस्थानातर्फे या मंदिर निर्माणाचं काम सुरू आहे. लमही या गावात सुभाष भवन बनल्यानंतर या मंदिराचं गेल्या वर्षभरापासून काम सुरू होतं.

📌लमही हे गाव प्रसिद्ध हिंदी कादंबरीकार मुन्शी प्रेमचंद यांचं जन्मगाव आहे. हे मंदिर आता बनून तयार आहे. मंदिरात ११ फूट उंच छत्राखाली नेताजींची सहा फूट उंच प्रतिमा स्थापन करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment