--सात वेळची ऑलिम्पिक पदकविजेता, अमेरिकन जिम्नॅस्ट आणि नऊ वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या शॅनन मिलरची 17 व्या वर्ल्ड अॅथलेटिक्स मुंबई मॅरेथॉन स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय इव्हेंट अॅम्बेसीडर म्हणून घोषणा करण्यात आली. 19 जानेवारी 2020 ला ही मॅरेथॉन होणार आहे.
-- 42 वर्षीय ही खेळाडू अमेरिकन जिम्नॅस्टिकमध्ये दिग्गज असून, अमेरिकेच्या ऑलिम्पिक 'हॉल ऑफ फेम'मध्ये 2006 (वैयक्तिक) आणि 2008 (सांघिक) असा दोन वेळा तिचा समावेश करण्यात आला आहे. असे करणारी ती पहिली महिला अॅथलिट आहे.
-- तिने 1992 ऑलिम्पिकमध्ये पाच पदक (दोन रौप्य, 3 कांस्यपदक) मिळवत कुठल्याही क्रीडाप्रकारात अमेरिकन अॅथलिटने मिळवलेले हे सर्वाधिक पदक ठरले.
-- यासोबत तिने 59 आंतरराष्ट्रीय व 49 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये विजय मिळवले आहेत. दोन जागतिक ऑल राऊंड जेतेपद मिळवणारी ती पहिली अमेरिकन जिम्नॅस्ट आहे.
-- 1996 गेम्समध्ये अमेरिकन महिलांनी पहिल्यांदा सांघिक सुवर्णपदक मिळवले. तसेच बॅलन्स बीममध्ये सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली अमेरिकेन जिम्नॅस्ट ठरली.
No comments:
Post a Comment