1) ठिबक सिंचन प्रणालीमध्ये वाळूच्या गाळणीची गरज खालील घटक सिंचनाच्या पाण्यातून काढण्यासाठी होते ?
अ) शेवाळ ब) पाण्यात विरघळलेले क्षार
क) काडी-कचरा ड) अतिसुक्ष्म मृदा कण
1) अ आणि ब 2) अ आणि क 3) ब आणि क 4) क आणि ड
उत्तर :- 2
2) गैबीयनच्या संदर्भात कोणत्या बाबी सत्य आहेत ?
अ) ते हाताळण्यासाठी लवचिक आहेत. ब) त्यांचे बांधकाम कमी खर्चाचे असते.
क) अपधावासाठी ते अपाय असतात. ड) ते सहज फुटू शकतात.
1) अ आणि ब 2) ब आणि क 3) अ आणि क 4) अ आणि ड
उत्तर :- 1
3) ............................ जमिनीसाठी तुषार सिंचन उपयुक्त आहे.
1) खार 2) उथळ व उताराच्या
3) आम्लधर्मी 4) अल्कधर्मी
उत्तर :- 2
4) ....................... सांडवा पाणी आडवून पाणी साठवण्यासाठी उपयोगात आणता येत नाही.
1) आघात 2) आघात प्रवेश 3) घसरणी 4) आपत्कालीन
उत्तर :- 3
5) एप्रिल 2002 मध्ये स्विकारलेल्या राष्ट्रीय जल नितीची ही उद्दिष्टये आहेत :
अ) जल संसाधनांच्या नियोजनासाठी चौकट तयार करणे. ब) एकात्मिक जल संसाधनांचा विकास.
क) उत्तरेतील नद्या दक्षिणेतील नद्यांशी जोडणे. ड) भूजल व्यवस्थापन.
1) अ आणि ब फक्त बरोबर आहेत 2) क आणि ड फक्त बरोबर आहेत
3) अ, ब आणि ड फक्त बरोबर आहेत 4) वरील सर्व बरोबर आहेत
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment