🌷चेन्नई : पाच वेळा जगज्जेतेपद पटकवणारा भारताचा विश्वनाथन आनंदचा खेळ पहिल्यासारखा सर्वोत्कृष्ट होत नसला तरी त्याच्या पन्नाशीच्या मानाने सर्वोत्तम आहे, असे मत माजी विश्वविजेता रशियाच्या व्लादिमिर क्रॅमनिकने व्यक्त केले आहे.
🌷‘‘आनंदने त्याच्या बुद्धिबळ खेळाच्या प्रदीर्घ कारकीर्दीत मोठी उंची गाठलेली आहे. त्यामानाने आता त्याला यश मिळत नसले तरी ५०व्या वर्षी आनंद सवर्ोेत्तम खेळ करत आहे. या वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने खेळणे हे सोपे नाही. पुढची पिढी वयाच्या पन्नाशीपर्यंत आनंदसारखे सातत्य दाखवू शकेल, असे मला वाटत नाही. अजून किती खेळायचे हे आनंदच ठरवू शकतो. जोपर्यंत तो खेळाचा आनंद घेत आहे, तोपर्यंत तो खेळत राहील, हे मात्र नक्की. कारण बुद्धिबळ हा खेळ अन्य खेळांसारखा शारीरिक ताकदीवर अवलंबून नाही. मात्र त्याच वेळेला युवा बुद्धिबळपटूंसोबत खेळणे हेदेखील एक आव्हानच आहे,’’ याकडे क्रॅमनिकने लक्ष वेधले.
🌷‘‘आनंद ज्या वेळेस जगज्जेतेपदाची लढत मॅग्नस कार्लसनकडून २०१३ मध्ये हरला तेव्हाच त्याला निवृत्तीचे सल्ले देण्यात येत होते. मात्र आनंदने आपल्या कामगिरीने सर्वाना उत्तर दिले,’’ असेही क्रॅमनिकने सांगितले. क्रॅमनिकने सध्या चेन्नईत युवा बुद्धिबळपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात यापैकीच सहा मुलांनी फ्रान्स येथे डाऊन क्रॅमनिककडून प्रशिक्षणाचे धडे गिरवले होते.
No comments:
Post a Comment