Thursday, 16 January 2020

अटल भूजल योजनेचा प्रारंभ

25 डिसेंबर 2019 रोजी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘अटल भूजल योजना (अटल जल) याचा प्रारंभ केला गेला.

या मोहिमेशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे ही 2024 सालापर्यंत देशातल्या प्रत्येक घरात पाणी पोहचवण्याचा प्रयत्न साध्य करण्याच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे.

जल शक्ती मंत्रालयाच्या नेतृत्वात ही योजना राबवली जाणार आहे. लोकसहभागाने जल संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न केले जाणारा आहेत. घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या दिशेने कार्य केले जात आहे.

▪️अटल भूजल योजना (अटल जल):-

भूजल व्यवस्थापनासाठी संस्थात्मक चौकट मजबूत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

गुजरात, हरयाणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या सात राज्यांमध्ये ओळखलेल्या भागांमध्ये शाश्वत भूजल संसाधन व्यवस्थापनासाठी समुदाय पातळीवर वर्तनात्मक बदल घडविणे या मुख्य उद्देशाने अटल जलची रचना करण्यात आली आहे.

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे या राज्यांमधील 78 जिल्ह्यांमधील जवळपास 8350 ग्रामपंचायतींना लाभ मिळण्याची शक्यता आहे.

सन 2020-21 ते सन 2024-25 या पाच वर्षांच्या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या या योजनेसाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी 50 टक्के जागतिक बँक कर्ज रूपात असतील.

सुधारित भूजल व्यवस्थापन पद्धतीत यश मिळवण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देणे जेणेकरुन सध्या अस्तित्वात असलेल्या योजना एकत्र करुन राज्य सरकार जल व्यवस्थापनाच्या संदर्भात मागणीनुसार प्राधान्यक्रम ठरवत सुस्पष्ट आखणी आणि अंमलबजावणी करु शकतील.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...