Tuesday, 7 January 2020

राज्यातील पहिले जडत्व तपासणी केंद्र "या' शहरात

◾️ शहराला होणारा पाणीपुरवठ्यातील जडत्व तपासणी (हेवी मेटल) केंद्र सोलापुरात उभारले जाण्याची शक्‍यता आहे.

◾️या संदर्भात सोमवारी मुंबईत झालेल्या बैठकीत चर्चा झाली. हे केंद्र सोलापुरात प्रत्यक्षात उभारल्यास तो महाराष्ट्र राज्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️राज्यातील पहिला असेल प्रकल्प 
दूषित पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा झाल्यास तो महाराष्ट्रातील पहिला पथदर्शी प्रकल्प असणार आहे.

◾️ यावेळी पाण्याची गुणवत्ता तपासणी आणि सुधारणा याबाबतही चर्चा झाली.

◾️महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्यातील जडत्व तपासणीचा प्रकल्प नाही.

◾️नागपूर येथे नीरी केंद्र आहे, पण तपासणी दिल्ली येथील कार्यालयात होते.

◾️सोलापुरातील पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात हे सर्वमान्य झाले आहे.

◾️सातत्याने अनेक वेगवेगळ्या प्रभागात गढूळ पाणी येत असतं. दूषित पाण्यामुळे 21 जणांचा बळी गेल्याच्या घटनाही सोलापुरातच झाल्या आहेत.

◾️नागरिकांना स्वच्छ आणि पुरेसे पाणी देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...