Saturday, 11 January 2020

फवाद मिर्झाने संपवला भारताचा वनवास; घोडेस्वारीमध्ये मिळवले टोकियो ओलीम्पिकचे तिकीट.

भारताचा युवा घोडेस्वार फवाद मिर्झाने गेल्या दोन दशकांपासूनही भारताची प्रतीक्षा अखेरीस संपवली आहे. २०१८ साली आशियाई खेळांमध्ये तब्बल ३६ वर्षांनी घोडेस्वारी प्रकारात पदक मिळवणाऱ्या फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालेलं आहे. याआधी भारताच्या इम्तियाज अनिस यांनी सिडनी ऑलिम्पिकमध्ये घोडेस्वारी (equestrian) मध्ये भारताचं नेतृत्व केलं होतं.

International Federation for Equestrian Sports तर्फे मंगळवारी फवादच्या ऑलिम्पिक तिकीटावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आलं. २७ वर्षीय फवादने गेल्या काही स्पर्धांमध्ये आश्वासक कामगिरी केली आहे. 

South East Asia आणि Oceania गटात फवादने अव्वल स्थान पटकावलं होतं. सहा पात्रता फेऱ्यांमध्ये फवादने ६४ गुणांची कमाई केली होती. या कामगिरीच्या जोरावर फवादला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट देण्यात आलं आहे.

२०१९ साली फवादला भारतीय क्रीडा क्षेत्रातील मानाच्या अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. त्यामुळे फवाद ऑलिम्पिकमध्ये कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...