- देशातली पहिली खासगी रेलगाडी दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरू झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी ‘तेजस’ एक्सप्रेस 17 जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असणार आहे.
▪️तेजस एक्सप्रेस
- या रेलगाडीचे व्यवस्थापन खासगी तत्त्वावर राखले जाते.
- या गाडीमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहे.
- तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा उपलब्ध आहेत.
- इंडियन रेल्वे कॅटरिंग अॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) यांच्यावतीने तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. केंद्र सरकारने IRCTC ला ही रेलगाडी भाडेतत्त्वावर दिली आहे.
- पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनऊ मार्गावर ऑक्टोबर 2019 मध्ये धावली.
- आठवड्यातला गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्सप्रेस धावणार.
▪️IRCTC विषयी
- इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, जी भारतीय रेल्वेचे खानपान, पर्यटन आणि ऑनलाईन तिकिटे या कार्यांची हाताळणी करते. ‘लाइफलाइन ऑफ द नेशन’ हे IRCTCचे घोषवाक्य आहे.
- दिनांक 27 सप्टेंबर 1999 रोजी IRCTCची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
-------------–-------------------–-------------
No comments:
Post a Comment