Wednesday, 1 January 2020

दुसरी तेजस एक्सप्रेस अहमदाबाद-मुंबई मार्गावर धावणार

- देशातली पहिली खासगी रेलगाडी दिल्ली-लखनऊ या मार्गावर सुरू झाल्यानंतर आता मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी ‘तेजस’ एक्सप्रेस 17 जानेवारी 2020 पासून प्रवाशांच्या सेवेसाठी तयार असणार आहे.

▪️तेजस एक्सप्रेस

- या रेलगाडीचे व्यवस्थापन खासगी तत्त्वावर राखले जाते.

- या गाडीमध्ये प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था आहे.

- तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना वाचनासाठी वैयक्तिक रीडिंग लाइट, मोफत वायफाय, प्रवाशांच्या सुविधेसाठी कर्मचारी, बायोटॉयलेट, स्वयंचलित दरवाजे, आरामदायी जागा आदी सुविधा उपलब्ध आहेत.

- इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) यांच्यावतीने तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. केंद्र सरकारने IRCTC ला ही रेलगाडी भाडेतत्त्वावर दिली आहे.

- पहिली तेजस एक्सप्रेस दिल्ली-लखनऊ मार्गावर ऑक्टोबर 2019 मध्ये धावली.

- आठवड्यातला गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी तेजस एक्सप्रेस धावणार.

▪️IRCTC विषयी

- इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे, जी भारतीय रेल्वेचे खानपान, पर्यटन आणि ऑनलाईन तिकिटे या कार्यांची हाताळणी करते. ‘लाइफलाइन ऑफ द नेशन’ हे IRCTCचे घोषवाक्य आहे.

- दिनांक 27 सप्टेंबर 1999 रोजी IRCTCची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.
-------------–-------------------–-------------

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...