Monday, 27 January 2020

चीनमधील भारतीयाला घातक विषाणूचा संसर्ग

चीनच्या वुहान आणि शेनझेन शहरात धोकादायक अज्ञात विषाणू फैलावत असून तेथील भारतीय शिक्षिकेला याचा संसर्ग झाला आहे. सिवियर ऍक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) सारख्या विषाणूचा संसर्ग झालेला चीनमधील त्या पहिल्या विदेशी नागरिक आहेत.

-शेंजेनव येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका असलेल्या प्रीति माहेश्वरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रीति यांना संबंधित विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली आहे.

-विषाणूचा संबंध सार्सशी असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सार्सने 650 जणांचा जीव घेतला होता. चीनमध्ये रविवारी या विषाणूच्या संसर्गाचे 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असून हे सर्वजण वुहान शहरातील आहेत.

- या विषाणूने शहरात आतापर्यंत 62 जणांनी प्रकृती बिघडविली असून यातील 8 जण गंभीर आहेत.
——————————————

No comments:

Post a Comment