• निती आयोगाच्या शाश्वत विकास उद्दिष्ट निर्देशांकात २०१९ मध्ये पुन्हा केरळच पहिल्या क्रमांकावर आले असून या शाश्वत विकास उद्दिष्ट पूर्ती योजनेत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची सामाजिक, आर्थिक, पर्यावरण क्षेत्रातील कामगिरी तपासली जात असते.
• एसडीजी इंडिया निर्देशांक २०१९ अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात उत्तर प्रदेश, ओडीसा, सिक्कीम या राज्यांनी बरीच प्रगती केल्याचे दिसून आले.
• गुजरातमध्ये २०१८ च्या क्रमवारी तुलनेत काही प्रगती झाली नाही.
• केरळने पहिला क्रमांक कायम राखला असून ७० गुण प्राप्त केले.
• हिमाचल प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर(score 69) असून आंध्र, तामिळनाडू, तेलंगणा यांनी संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला.(score 67)
• कर्नाटक राज्याला ६६ गुण असून कर्नाटक चौथ्या क्रमांकावर येईल
• सिक्कीमचे गुण ६५ असून राज्यामध्ये सिक्कीमचा पाचवा क्रमांक लागतो
• महाराष्ट्र, तसेच गोवा आणि उत्तराखंड राज्यांना ६४ गुण मिळाले आहेत. (महाराष्ट्राने composite SDG मध्ये 64 गुण मिळवले आहेत)
• बिहार, झारखंड, अरुणाचल यांची कामगिरी खराब झाली आहे.
• चंडीगड केंद्रशासित प्रदेशात प्रथम क्रमांकावर असून त्याला ७० गुण मिळाले.
• छत्तीसगड, कर्नाटक, आसाम, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, ओडिशा, गुजरात, मणिपूर, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार आणि झारखंड ही राज्ये अजून गरीब झाली आहेत.
• निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी हा अहवाल जारी करताना सांगितले की, संयुक्त राष्ट्रांची शाश्वत विकास उद्दिष्टे २०३० पर्यंत साध्य करताना त्यात भारताची मोठी भूमिका असणार आहे.
• भारत आर्थिक प्रगतीमध्ये 65 वरून 64 पर्यंत खाली आला आहे.
• दक्षिणेकडील राज्यांची आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी:-
• निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे की, दक्षिणेकडील राज्यांनी आरोग्यक्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे.
• पश्चिम बंगालचा चौदावा क्रमांक आला असून त्यांनी चांगली कामगिरी केली आहे.
• भारताची तीन स्थानांनी सुधारणा झाली असून तो ५७ वरून ६० वर आला आहे.
• भारताचे संयुक्त गुण(Composite SDG) २०१८ मध्ये ५७ होते ते २०१९ मध्ये ६० झाले असून पाणी, स्वच्छता, उद्योग व नवप्रवर्तनात चांगली कामगिरी झाली आहे.
• पहिल्या पाच राज्यांपैकी तिघांनी १२ उद्दिष्टात देशाच्या सरासरीपेक्षा चांगली कामगिरी केली, तर इतर दोन राज्यांनी ११ उद्दिष्टात सरासरी उद्दिष्टापेक्षा चांगली कामगिरी केली.
• २०१९ मध्ये ६५-९९ गुणात एकूण आठ राज्ये असून त्यात हिमाचल, केरळ, तामिळनाडू यांच्यासह आता आंध्र, तेलंगण, कर्नाटक, सिक्कीम, गोवा यांची भर पडली आहे.
दारिद्रय़ निर्मूलनात तामिळनाडू आघाडीवर
• दारिद्रय़ निर्मूलनात तामिळनाडू, त्रिपुरा, आंध्र, मेघालय, मिझोराम व सिक्कीम यांनी चांगली कामगिरी केली.
• शून्य भूक निकषात गोवा, मिझोराम, केरळ , नागालँड, मणिपूर आघाडीवर आहेत.
No comments:
Post a Comment