- काम किंवा करमणुकीसाठी कराव्या लागणार्या प्रवासाचा वेळ कमी करण्याच्या आणि शहरी विकासाला अधिक शाश्वत बनविण्याच्या उद्दीष्टांना दृष्टीपथात ठेवत, राजधानी दिल्लीमध्ये देशातल्या पहिल्या संक्रमण-उन्मुख विकास (Transit-oriented development -TOD) प्रकल्पाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे.
- केंद्रीय गृह व शहरी कल्याण मंत्रालय आणि दिल्ली विकास प्राधिकरण यांच्या TOD धोरणाच्या अंतर्गत चालणारा हा पहिलाच प्रकल्प आहे.
▪️ठळक बाबी
- स्मार्ट शहर उभे करण्याच्या पार्श्वभूमीवर, दिल्लीत भारतातली पहिली रीजनल रॅपिड ट्रांझिट सिस्टम (RRTS) उभारली जात आहे. हा प्रकल्प त्याचा एक भाग आहे.
- मेट्रो स्थानके, निवासस्थाने आणि कामाचे ठिकाण तसेच संग्रहालये, ग्रंथालये यासारख्या मनोरंजक जागा यांना एकत्र जोडून प्रवास सुकर करण्याच्या उद्देशाने एकात्मिक विकास केला जात आहे. हा प्रकल्प 2023 सालापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
- एका नियोजनबद्ध पद्धतीने मेट्रो स्थानके, रेल्वे स्थानक, आंतरराज्यीय बस सेवा स्थानके, सौर ऊर्जा केंद्रे आणि पुनर्वापरासाठी जलप्रक्रिया यासारख्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात आहे.
No comments:
Post a Comment