Wednesday, 1 January 2020

मेट्रो स्थानकाला मिळणार सुप्रीम कोर्टाचं नाव

🎆 दिल्लीमधील प्रगती मेट्रो स्टेशन यापुढे सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन या नावाने ओळखलं जाणार आहे. दिल्ली सरकारने प्रगती मेट्रो स्टेशनचं नाव बदलून सुप्रीम कोर्ट मेट्रो स्टेशन करण्याचा निर्णय घेतला आहे.

🎆 दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेदरम्यान यासंबंधी घोषणा केली. यावेळी त्यांनी नामांतराची पूर्ण प्रक्रिया तसंच मेट्रो ट्रेनमध्ये होणारी उद्घोषणा यासाठी महिन्याभराचा कालावधी लागेल अशी माहिती दिली.

🎆 तर मनिष सिसोदिया यांनी यावेळी मुबारक चौकाला शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांचं नाव देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.
🔸🔹

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...