Saturday, 11 January 2020

रेल्वे मंत्रालय आणि बर्मिंगहॅम विद्यापीठादरम्यान अत्याधुनिक दळणवळण व्यवस्थेच्या उभारणीसाठी उत्कृष्टता केंद्र स्थापनेबाबात सामंजस्य करार

रेल्वे मंत्रालयांतर्गत असलेले स्वायत्त विद्यापीठ राष्ट्रीय रेल्वे वाहतूक संस्थाआणि बर्मिंगहॅम विद्यापीठादरम्यान नवी दिल्लीत रेलभवन येथे सामंजस्य करार करण्यात आला.

अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्यादृष्टीने रेल्वेचे पहिले उत्कृष्टता केंद्र भारतात स्थापन करण्याबाबत हा करार करण्यात आला. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

भारतीय रेल्वे हे उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार असून, या केंद्रातून रेल्वेसंदर्भातली अद्ययावत आकडेवारी, माहिती, व्यावसायिक तज्ज्ञ, उपकरणे आणि इतर सर्व संसाधने रेल्वे संस्थांना तसेच संशोधन संस्थांना पुरवली जातील.

या उत्कृष्टता केंद्रात उद्योग जगत आणि अध्ययन संस्थांशी भागिदारीही स्वीकारली जाईल. रेल्वे आणि रेल्वे वाहतुकीच्या क्षेत्रात अत्याधुनिक विकासाला चालना देण्यासाठी हे केंद्र काम करेल.

आधुनिक संशोधनाची तसेच जागतिक पातळीवर रेल्वेत वापरल्या जाणाऱ्या पद्धतींची माहिती या केंद्रातून मिळू शकेल. रेल्वेची क्षमता वाढवण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल ठरेल.
 

No comments:

Post a Comment