Saturday, 11 January 2020

आजपासून साहित्य संमेलनाला सुरुवात

💁‍♂ 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आजपासून उस्मानाबाद येथे सुरु होत आहे. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली येत्या रविवारपर्यंत (दि.12) हे संमेलन चालणार आहे.

👉 अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्याकडून या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

🧐 *कार्यक्रमाचे स्वरूप :*

▪ सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होईल. संत साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्य मांडणारे ग्रंथ पालखीत असणार

▪ सकाळी 11 वाजता ध्वजारोहण तर उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी 4 वाजता होणार

▪ संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची 200 दालने उभारण्यात आली आहेत.

👀 *प्रमुख उपस्थिती :* संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना.धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे इ.

💐 *यांचा होणार सत्कार :* माजी संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोत्तापल्ले, डॉ.सदानंद मोरे, डॉ.श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख इ.

💥 *विरोधाचे सावट :* संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच ज्येष्ठ कवी व उद्घाटक ना. धों. महानोर यांना संमेलनाला न जाण्याची फोनद्वारे धमकी दिली गेली असल्याने त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

📍 दरम्यान, मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी संमेलनास उपस्थित असले तरी त्यांना व्यासपीठावर न बसवता, पहिल्या रांगेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment