Sunday, 12 January 2020

खार्‍या पाण्यातल्या मत्स्यपालनाचा पहिला वैज्ञानिक प्रयोग भारतात यशस्वी

केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्थेनी (CMFRI) कृत्रिम तलावांमध्ये इंडियन पोम्पेनो (पामलेट) या मत्स्यप्रजातीचे पालन करण्यासाठी एक संभाव्य वैज्ञानिक पद्धत विकसित केली आहे.

पोम्पेनो ही मत्स्यप्रजाती समुद्राच्या खार्‍या पाण्यात आढळते. या माश्याला सर्वाधिक मागणी आहे. तलावांमध्ये इंडियन पोम्पेनोचे पालन हे कोळंबीला एक चांगला पर्याय ठरतो.

ठळक बाबी

🔸वैज्ञानिक पद्धतीच्या यशस्वी शोधानंतर विशाखापट्टणम येथे तलावांमध्ये अधिकृतपणे मत्स्यपालन केले जाणार आहे. पोम्पेनो या मत्स्यप्रजातीच्या पालनासाठी वैज्ञानिक पद्धत विकसित करण्याचा हा भारतातला पहिलाच प्रयोग आहे.

🔸या पद्धतीमध्ये जवळपास 95 टक्के मासे जिवंत राहतात, असे आढळून आले आहे.

🔸या पद्धतीनुसार एकरामागे 3 टनचे उत्पादन होते आणि एकरामागे होणार्‍या उत्पादन खर्चाच्या 25-30 टक्क्यांपर्यंत नफा मिळू शकतो.

🔸या शोधकार्यासाठी राष्ट्रीय मत्स्यव्यवसाय विकास मंडळाने (NFDB) आर्थिक मदत केली.

No comments:

Post a Comment