Monday, 20 January 2020

मराठी व्याकरण

1) पुढीलपैकी कोणता सामासिक शब्द समाहार व्दंव्द समासात आढळत नाही?

1) केरकचरा   
2) नीलकंठ ✅✅
3) घरदार   
4) मीठभाकर

2) दोन शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल ?
  
1) संयोग चिन्ह  ✅✅
2) अपूर्ण विराम   
3) स्वल्पविराम   
4) यापैकी नाही

3) पुढीलपैकी कोणता शब्द ‘साधित’ शब्द नाही ?
  
1) भांडखोर   
2) बेजबाबदार   
3) थोरवी   
4) इमारत✅✅

4) ‘बांगडी फुटणे’ या शब्दाचा ध्वन्यार्थ ओळखा.
   अ) पराभूत होणे    ब) काळोख होणे   
   क) वैधव्य येणे    ड) भांडण होणे

1) अ फक्त बरोबर बाकी सर्व चूक   
2) ब फक्त बरोबर बाकी सर्व चूक
3) क फक्त बरोबर बाकी सर्व चूक ✅
4) ड फक्त बरोबर बाकी सर्व चूक

5) ‘तटिनी’ कुणाला म्हणतात  ?
  
1) ताटातुटीला     
2) नदीला  ✅✅ 
3) अटीतटी करणा-याला   
4) तरटांनी बांधलेल्या झोपडीला

1】' रंगात येणे ' या वाक्प्रचारासाठी योग्य अर्थ निवडा. ?

1) खूप मजा येणे
2) तल्लीन होणे ✅✅
3) विजय मिळवणे
4) फेर धरणे

2】 ' बिंब ' या शब्दाला खालीलपैकी कोणते उपसर्ग जोडले असता बनणारा शब्द मूळ शब्दाच्या विरुद्ध अर्थाचा असेल. ?

1) गैर
2) यथा
3) प्रति ✅✅
4) बिन

3】' कुस्ती खेळण्याची जागा ' या शब्द समुहासाठी योग्य शब्द निवडा. ?

1) तट
2) हौद ✅✅
3) डोह
4) यापैकी नाही

4】' शावक ' कोणाचे असते ?

1) गाढवाचे
2) हरणाचे ✅✅
3) सिंहाचा
4) यापैकी नाही

5】' भाव ' या शब्दाचा अर्थ असणारे पर्याय निवडा.  ?

अ) भक्ती
ब) किंमत 
क) दर
ड) भावना

1) अ, ब, क
2) ब, क, ड
3) अ, क, ड
4) अ, ब, क, ड ✅✅

1) “जो अत्यंत खर्चिक असतो तो” या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

1) उधळया  ✅✅ 
2) कंजूष     
3) दानशूर  
4) चिकट

2) निष्कपट या शब्दाची संधी खालीलपैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

1) नि: + कपट✅✅  
2) निष् + कपट   
3) निष्क + पट   
4) न: क + पट

3) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.
  
1) पंचमी   
2) संबोधन✅✅   
3) सप्तमी   
4) षष्ठी

4) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.

1) विधानार्थी   
2) प्रश्नार्थी   
3) उद्गारवाची ✅✅
4) होकारार्थी

5) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.
  
1) रामाने रावणास मारला     
2) रामाकडून रावण मारला गेला
3) राम रावणास मारील     
4) रामाने रावणास मारले✅✅

1) मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा.
  
1) मुसळधार ✅✅  
2) पाऊस   
3) पडला   
4) पाऊस पडला

2) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
     ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’
  
1) कर्मभाव संकर प्रयोग   
2) मिश्र किंवा संकर प्रयोग
3) भावकर्तरी प्रयोग ✅✅  
4) कर्म – कर्त प्रयोग

3) पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ................... समास होतो.
  
1) बहुव्रीही   
2) कर्मधारय   
3) व्दिगू ✅✅  
4) व्दंव्द

4) कंसातील विरामचिन्हे ओळखा.

(;)
  
1) अपूर्ण विराम   
2) स्वल्प विराम   
3) अर्धविराम ✅✅  
4) यापैकी नाही

5) पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे ?
  
1) आसू   
2) खर्च ✅✅    
3) आंबा   
4) परशू

1) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.
  
1) आनंद होणे     
2) अतिदु:ख होणे ✅✅  
3) डोंगर खाली येणे   
4) सुख:द घटना घडणे

2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.
  
1) अकलेचा कांदा   
2) अरण्य पंडित   
3) उंटावरचा शहाणा   
4) कळीचा नारद✅✅

3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.
  
1) नीस्तेज   
2) नि:स्तेज   
3) निस्तेज ✅✅  
4) नि:तेज

4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.
  
1) चंपक – चम्पक   
2) छंद – छन्द   
3) अंबुज – अम्बुज   
4) धुवून – धुऊन✅✅

5) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.
  
1) सदाचार     
2) जगदीश   
3) करून   ✅✅  
4) काहीसा

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...