२५ जानेवारी २०२०

पोपटराव पवार आणि राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्मश्री पुरस्कारांची घोषणा केली आहे. एकूण २१ जणांचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार आणि बीजमाता राहिबाई पोपेरे यांना पद्मश्री जाहीर झाला आहे.

पोपटराव पवार आणि जलसंधारण :
अहमदनगरच्या आदर्श गाव हिवरेबाजारचे माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी जलसंधारण क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. पोपटराव पवार  गेल्या २० ते २५ वर्षाहूनही अधिक काळ पाणलोट क्षेत्र विकास हा एकाच कार्याला वाहून घेतले आहे.

'बीजमाता' राहीबाई पोपेरे :
महाराष्ट्रात बियाणांची बँक राहीबाई पोपेरे चालवितात. 'बीजमाता' म्हणून देखील त्यांना ओळखले जाते. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते. शंभरहून अधिक देशी बियाणांचे जतन राहीबाई पोपरे यांनी केले आहे. नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

Mpsc pre exam samples questions

1) भारतीय राज्यघटनेच्या कलम 21(आनुसार प्रत्येक राज्याने कोणत्या वयोगटातील मुलांना निःशुल्क, सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार प्रदान केला आहे?  A. ...