➡️अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास भारतालाही त्याचा फटका बसू शकतो. इराणचे टॉप कमांडर कासिम सुलेमानी यांच्या मृत्यूवरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी बगदाद विमानतळाजवळ अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात कासिम सुलेमानी यांचा मृत्यू झाला.
➡️भारतावर काय परिणाम होणार?अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध झाल्यास फक्त ऊर्जा पुरवठयावरच परिणाम होणार नाही तर, आखातामध्ये राहणाऱ्या भारतीयांनाही त्याचा फटका बसेल.
➡️सुलेमानी यांच्या मृत्यूनंतर तेलाच्या किंमती आधीच चार टक्क्यांनी वाढल्या आहेत. युद्ध भडकल्यास पश्चिम आशियामध्ये वास्तव्याला असलेल्या ८० लाख भारतीयांच्या भवितव्यावर त्याचा परिणाम होईल.
➡️एकटया सौदी अरेबियामध्ये तीस लाख भारतीय राहतात. यापूर्वी या भागात झालेल्या युद्धाचा तिथे राहणाऱ्या भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांवर परिणाम झाला होता. भारताची मुख्य चिंता काय? भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे, पश्चिम आशियात राहणारे भारतीय तिथून मोठया प्रमाणावर पैसा पाठवतात.
➡️ही रक्कम अब्जावधीच्या घरात आहे. भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणींचा सामना करत असताना दुसऱ्या देशाच्या युद्धामुळे बसणारा फटकाही परवडणारा नाही.
➡️चाबहार बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ ८० किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.
No comments:
Post a Comment