Friday, 24 January 2020

केरळ: मसाला कर्जरोखे विकणारे पहिले राज्य


केरळ राज्य सरकारने लंडन स्टॉक एक्सचेंज (LSE) याच्या व्यासपीठावर केरळ इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट फंड बोर्ड (KIIFB) कडून विकले जाणारे मसाला कर्जरोखे सूचीबद्ध केले आणि हे रोखे विकणारा तो पहिला राज्य बनला.

या कर्जरोख्यांचे एकूण मूल्य 312 दशलक्ष डॉलर (म्हणजेच 2,150 कोटी रुपये) इतके आहे. रोख्यांचा कालावधी 5 वर्षांचा आहे.

केरळमधील मोठ्या आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याच्या उद्देशाने निधी उभारण्यासाठी मसाला कर्जरोख्यांद्वारे 5,000 कोटी रुपये उभारण्याची केरळ सरकारची योजना आहे.

*मसाला कर्जरोखे....?*

भारतीय रुपया या भारतीय चलनामध्ये परदेशात विकले जाणारे कर्जरोखे मसाला कर्जरोखे (Masala Bonds) म्हणून ओळखले जाते.

मसाला कर्जरोखे म्हणजे भारतीय कंपन्या परदेशी चलनाच्या स्वरुपात परदेशी बाजारपेठेमधून कर्जरोखे वाटप न करता, ते भारतीय चलनाच्या मूल्यानुसार सादर करू शकतात आणि त्यामधून आवश्यक तेवढा पण मर्यादीत पैसा उभारू शकतात.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चलनाच्या मुल्यातल्या चढ-उताराच्या परिस्थितीमुळे उद्भवणारा धोका टाळण्यासाठी भारतीय चलनासह मसाला कर्जरोखे सादर करण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...