Saturday, 25 January 2020

​​​​ पाकिस्तानात सर्वात जास्त भ्रष्टाचार; डेन्मार्क, न्यूझीलंडमध्ये सर्वांत कमी भ्रष्टाचार

•  भारतातील भ्रष्टाचाराचे प्रतिबिंब ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने जाहीर केलेल्या भ्रष्टाचार निर्देशांक यादीत (करप्शन परसेप्शन इंडेक्‍स- सीपीआय) पडल्याचे दिसत आहे.

• यात जगातील १८० देशांमध्ये भारताचे स्थान ८० वे आहे.

📚 भारताची घसरण

• तज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्राशी संबंधित व्यक्तींच्या मतांनुसार जागतिक आर्थिक परिषदेत जाहीर झालेल्या ‘सीपीआय’च्या अहवालात १८० देशांची आणि प्रांतांची यादी प्रसिद्ध केली आहे.

• त्या-त्या देशांत सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या व्याप्तीच्या आधारे गुणांसह क्रमांक देण्यात आले आहेत.

• यात भारत ४१ गुणांसह ८० व्या स्थानावर आहे.

✅ या स्थानावर भारतासह
📌 चीन,
📌 बेनिन,
📌 घाना आणि
📌मोरोक्को हे देश आहेत.

• भारताचा शेजारी देश पाकिस्तान हा १२० व्या क्रमांकावर आहे.

• शेजारील देशांच्या तुलनेत भारतीची स्थिती चांगली असली, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत भारत दोन स्थानाने घसरला आहे.

• गेल्या वर्षी भारताचा क्रमांक ७८ वा होता.

No comments:

Post a Comment