Wednesday, 1 January 2020

चालू घडामोडी (एप्रिल २०१९) आयोग:-

● निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलीफुल्ला :-
अयोध्येतील रामजन्मभूमी जमीन वादाप्रकरणी मध्यस्थामार्फत सहमतीने सोडवावा असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार आहे. निवृत्त न्यायमूर्ती इब्राहिम खलीफुल्ला या समितीचे अध्यक्ष असतील. वरिष्ठ वकील श्रीराम पांचू आणि आध्यात्मिक गुरु श्री श्री रवीशंकर यांचा या त्रिसदस्यीय समितीत समावेश आहे.

● देवेंद्र फडणवीस:-
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने धनगर समाजाच्या विविध मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या उपसमितीमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील, सुभाष देसाई, प्रा. राम शिंदे, महादेव जानकर, पंकजा मुंडे, विष्णू सवरा, एकनाथ शिंदे, राजकुमार बडोले आणि संभाजी पाटील- निलंगेकर यांचा समावेश.

● मोहित शहा शोध समिती:-
राज्य सरकारने राज्य माहिती आयोगातील माहिती आयुक्तांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु केली असून,या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संक्षिप्त यादी तयार करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्या अध्यक्षतेखाली शोध समिती स्थापन करण्यात आली

● उषा थोरात समिती:-
देशाबाहेरील रुपयाच्या बाजारासंदर्भात अभ्यास करण्यासाठी RBI ने उषा थोरात यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. आठ सदस्य असलेली ही समिती देशाबाहेरील रुपयाच्या बाजारपेठेच्या विकासाच्या कारणांचे मूल्यांकन करणार आणि स्थानिक बाजारपेठेतले रुपयाचे विनिमय दर आणि बाजारातली तरलता यावर देशाबाहेरील बाजारपेठेच्या प्रभावांचा अभ्यास करणार आहे तसेच ही समिती स्थानिक बाजारात प्रवेश करण्यासाठी अनिवासी लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपाययोजनांची देखील शिफारस करणार आहे.

--------------------------------------------------

No comments:

Post a Comment