केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट’ या द्वैवार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा अहवाल भारतीय वन सर्वेक्षणाने (FSI) प्रकाशित केला आहे.
अहवालात देशातल्या वन आणि वृक्ष संसाधनांचा द्वैवार्षिक आढावा घेण्यात आला आहे. 1987 सालापासून अशा अहवालांचे प्रकाशन होत असून, हा 16वा अहवाल आहे. वन आच्छादनात सातत्याने वाढ झालेली आहे, असे या अहवालामधून दिसून आले आहे.
👉सध्याच्या आकडेवारीनुसार –
🔸दाट, मध्यम आणि विरळ असे जंगलाचे तीन प्रकार आहेत. या तिन्ही प्रकारच्या जंगलात वाढ झाली आहे.
🔸देशातले एकूण वन आणि वृक्ष आच्छादन 80.73 दशलक्ष हेक्टर इतके असून, ते देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.56 टक्के आहे.
🔸वर्ष 2017 च्या अंदाजाच्या तुलनेत देशातल्या एकूण वन आणि वृक्ष आच्छादनात 5188 चौ. किलोमीटरची वाढ दिसून आली आहे. त्यापैकी वन आच्छादन 3976 चौ. कि.मी. तर वृक्ष आच्छादन 122 चौ. कि.मी. इतके आहे.
🔸कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, जम्मू व काश्मीर तसेच हिमाचल प्रदेश ही पाच राज्ये वृक्ष आणि वन क्षेत्राच्या वाढीत आघाडीवर आहेत. मणीपूर, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, मेघालय आणि नागालँड या राज्यांतल्या वन क्षेत्रात घट झाली आहे.
🔸देशात क्षेत्रफळाचा विचार करता वन आच्छादनात मध्यप्रदेश पहिल्या क्रमांकावर असून, त्या खालोखाल अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागत आहे.
🔸समुद्राचे पर्यावरण सांभाळणाऱ्या खारफुटीच्या जंगलातदेखील 54 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे. यात गुजरात राज्य आघाडीवर असून त्या ठिकाणी 37 चौरस किलोमीटर, महाराष्ट्रात 16 चौरस किलोमीटर तर ओडिशामध्ये 8 चौरस किलोमीटर खारफुटीचे जंगल वाढले आहे.
🔸देशात बांबू आच्छादित क्षेत्र 16.00 दशलक्ष हेक्टर एवढे असल्याचे अंदाजित करण्यात आले आहे.
🔸जंगलातला पाणथळ भाग पर्यावरणासाठी महत्त्वपूर्ण असून, या ठिकाणी जैवविविधता आढळून येते. या अहवालानुसार, देशात 62,466 पाणथळ जागा आहेत.
🔸भारताच्या जंगलांतला कार्बनचा साठा 7124.6 दशलक्ष टनच्या जवळपास आहे. गेल्या दोन वर्षांत या साठ्यात 42.6 दशलक्ष टन इतकी वाढ झाली आहे.
🔸सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.
No comments:
Post a Comment