Monday, 27 January 2020

भारत पर्व 2020: लाल किल्ला मैदानावर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला

⛔️भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा “भारत पर्व-2020” या पाचव्या वार्षिक महोत्सवाला नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर 26 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आहे. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

⛔️कार्यक्रमाची संकल्पना: “एक भारत - श्रेष्ठ भारत” आणि “महात्मा गांधींची 150 वी जयंती”

⛔️भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना देशातल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच “देखो अपना देश” ही संकल्पना रुजविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

⛔️नागरिक कुठल्याही प्रवेश शुल्काशिवाय त्यांचे कोणतेही ओळखपत्र दाखवून दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत भारतपर्व महोत्सवाला भेट देऊ शकतात. या ठिकाणी स्थळांविषयी माहिती देण्यासोबतच विविध कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाते.

⛔️यामध्ये भारताची पाक संस्कृती, कला संस्कृती आणि राज्यांच्या विविधतापूर्ण संस्कृती, प्रदर्शनी आणि मेळावे अश्या कार्यक्रमांचे दर्शन घडविले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...