Tuesday, 7 January 2020

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरी 2020

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने लातूरच्या शैलेश शेळकेला 3-2 अशा गुणफरकाने पराभूत केले.

◾️ याचबारोबर महाराष्ट्राला यंदा नवा महाराष्ट्र केसरी मिळाला आहे.

◾️ ही लढत पाहण्यासाठी खासदार आणि महाराष्ट्र कुस्ती परिषदेचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित होते.

◾️६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

◾️महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील म्हणजे काका पवारांचे पठ्ठे मैदानात होते.

No comments:

Post a Comment

Latest post

सर्व परीक्षांसाठी महत्त्वाचे प्रश्न

प्रश्न –: हिराकुड धरण कोणत्या राज्यात आहे? उत्तर: ओडिशा प्रश्न –: स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? उत्तर –: सी. राजगोपालाचारी ...