Monday, 27 January 2020

राज्यसेवा 2020 – CSAT Best Strategy

राज्यसेवा २०२० - CSAT

CSAT पूर्वपरीक्षा पास करण्यासाठीचा अनिर्वार्य घटक. 2013 पासून अभ्यासक्रमात समाविष्ट असलेला हा घटक आपणापैकी काहींसाठी मित्र आहे तर काहींसाठी कट्टर शत्रू ….शेवटी हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा प्रश्न आहे. आपण CSAT ला का घाबरतो? त्याचे मला सापडलेले उत्तर म्हणजे त्याबद्दल निर्माण करण्यात आलेले गैरसमज आणि सोबतच अतिशयोक्ती सुद्धा गैरसमज यासाठी या विषयासाठी काय काय करावे याचे अनेक साधक मार्गदर्शन उपलब्ध आहे परंतु कसे कसे करावे यांच्या मार्गदर्शनाचा अभाव .अतिशयोक्ती यासाठी कोणताही क्लास लावण्याची गरज नाही अशी मांडण्यात आलेली गृहीतके! मार्गदर्शनाशिवाय याला पर्याय नाही हे अमान्य असलेले सत्य आहे.

मित्रांनो , Aptitude म्हणजे काय ? तर तुमचा बुद्धांक होय . तो तर गणित , बुद्धिमत्ता या विषयातून तपासला जाऊ शकत होता . मग उताऱ्यांची संकल्पना का बर परीक्षकांना सुचली असेल ? याचे उत्तर असे आहे की आयोगाला तुमच्यातला Spark, झटपट निर्णय घेण्याची क्षमता , कोड सोडविण्याची हातोटी , शासनाने सोपविलेली जबाबदारी पूर्ण करण्याचे कसब किती आणि ते कोणत्या प्रमाणात आहे ते शोधून काढायचे आहे आणि म्हणूनच CSAT ची चाळण त्यांनी तयार केली .

CSAT च्या सर्व पेपर चे घटकनिहाय विश्लेषण येथे दिले आहे संपूर्ण निरीक्षणाअंती हे स्पष्ट आहे की दरवर्षी आकलन या घटकाचे 50 प्रश्न निश्चितच आहेत वर्षागणिक बुद्धिमत्तेच्या प्रश्नांची संख्या वाढत जात आहे तर गणिताच्या प्रश्नांची संख्या कमी होत आहेत तसेच निर्णय क्षमता या घटकाचे पाच प्रश्न निश्चित आहेत आपण प्रत्येक घटकाचा अभ्यास कसा करावा याचा संदर्भ पाहू.

आकलन –
आपण जेव्हा उतारे सोडवतो तेव्हा त्यांना आपल्या ज्ञानाची तपासणी करायचीच नाहीये . त्यांना आपण ते सांगतात किंवा आदेश देतात ते पाळण्यासाठी किती तयार आहोत हे तपासायचे आहे . म्हणूनच उतारे सोडविणे ही एक कला आहे . ज्याच्या आधारे आपण पूर्वपरीक्षेचे बरेच मोठे अंतर पार करु शकतो . उतारे सोडविणे ही एक कला आहे असे मी त्यासाठीच म्हटले की पाठ करुन , सगळ्या Trick , क्लुप्त्या वगैरे वगैरे करुनच हे करता येत नाही , तर याचा एकमेव म्हणजे एकमेव मार्ग हा विपुल सराव करणे हाच आहे . पण त्याआधी आयोगाचे उतारे समजून घेऊन यांची प्रश्न पद्धती आत्मसात करणे आवश्यक आहे .

बरचे जण २०१३ ते २०१९ – हे आयागाचे पेपर बघणे साडेविणे हे महत्त्वाचे समजतच नाहात . ते बाह्य पुस्तकावरच जास्त अवलंबून राहतात . तसे करणे हे अतिशय नुकसानदायक आहे . कारण , कोणताही क्लास , पुस्तक तुम्हाला अधिकारी बनविणार नाही . तुम्हाला अधिकारी पदावर आयोगच नेऊन बसविणार आहे . त्यामुळे आयोगाच्या अटी , दिशा पाहणे अत्यावश्यक आहे .

मागच्या ७ वर्षाच्या पत्रिकांचे विश्लेषण आपण केले तर आपल्या असे लक्षात येईल की , २०१३ – १४ पेक्षा नंतरचे पेपर हे जास्त कठीण आहेत . २०१३ – १2 मध्ये उतारे आणि त्यांचे प्रश्न यामध्ये ससत्रता वगेळ्या प्रकारचा होती . तर २०१५ – २०१६ – २०१७ यामध्ये उताऱ्यांचा दर्जा हा वगेळा होता . तो तपासायचा , समजून घ्यायचा म्हणजे उतारे सोडविताना अनुचित आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होईल . २०१८ चा पेपर हा त्यामानाने सोपा असा म्हणता येईल . . . पण तरीही त्यामध्ये आयोगाने निश्चित केलेली पातळी गाठणे शक्य झालेले नाही . २०१९ चा पेपर हा समसमान काठिण्य पातळीचा ठरला .

1) Reading Comprehension –
उतारे सोडवितांना लक्षात घ्यावयाच्या प्रमुख बाबी :

१ ) आधी उतारा वाचाया की प्रश्न वाचावेत ? — माझे तुम्हाला हेच स्पष्ट सांगणे असेल की आधी उतारा वाचावा . कारण त्यामुळे प्रश्न सोडविताना गोंधळ होणार नाही . सामान्यपणे आपण आधी प्रश्न वाचतो मग उतारा वाचतो . त्यामुळे मूळ उद्देश – आकलन यालाच धमा पोहचतो कारण आपण फक्त त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यावरच नजर भिरभिरवतो . आकलन होत नाही , मग उतारे चुकतात . म्हणून आधी उताराच वाचावा .

२ ) उताऱ्याचे वाचन कसे करावे ? —
याचे योग्य आणि सोपे उत्तर असे आहे की उताऱ्यातील प्रत्येक शब्द फोड करत करत वाचावा . वाक्यामध्ये असणाऱ्या विराम चिन्हांचा म्हणजेच पूर्णविराम , स्वल्पविराम , अवतरणचिन्हे , काळ यांचा व्याकरणीय दृष्टीकोनातून विचार करावा . आपण वाचताना सरळसरळ वाचत सुटतो . विरामाचिन्हांचा विचार करत नाही . हीच चूक कटाक्षाने टाळावी .

३ ) Key – Words किंवा महत्त्वाचे शब्द — बऱ्याचदा आपल्याला महत्त्वाचे वाटणारे शब्द हे प्रश्न कत्यांना महत्त्वाचे वाटतातच असे नाही किंवा त्याने ज्या दृष्टीकोनाने प्रश्न विचारला आहे तो आपल्या जवळ असेलच असेही नाही . मग यावर नेमका उपाय कोणता ? तर वाचन करत असताना की , च , आणि , व , परंतु , किंवा यांसारख्या शब्दांना गोल करा , काही शब्दांचे समानार्थी शब्द शोधा . सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला असणारे ज्ञान आणि उताऱ्यामध्ये दिलेली माहिती यात गल्लत करु नका . समजा उताऱ्यात असे नमूद केले की , राहुल गांधी भारताचे पंतप्रधान आहेत . तर हेच अंतिम सत्य मानावे . In short , Don’t put your own knowledge .

४ ) वेळेचे नियोजन —
१२० मिनीटात आपल्याला ८० प्रश्न सोडवायचे आहेत . त्यामुळे त्यातील ५० प्रश्न उताऱ्याशी संबंधित येतात . एकूण १० उतारे असतात तर प्रत्येक उतारा हा ७ मिनीटात सोडवावा . म्हणजे ७० मिनीटे होतील . Decision Making ५ मिनीटात ५ पूर्ण करावे . अशाप्रकारे केवळ ७५ मिनीटात आपण १३७ . ५ गुणांचे प्रश्न पूर्ण सोडवतो . उर्वरित ४५ मिनीटात गणित व बुद्धिमत्ता सोडवावे आणि शेवटची ५ मिनीटे हे एकदा चेकींगसाठी द्यावेत . सर्वसाधारणपणे ७० – ७५ प्रश्न सोडवणे हे सर्वोत्तम आहे . त्यापेक्षा जास्त सोडवत असाल तर Accuracy चेक करत राहा . उतारे सोडवताना तमचा आत्मविश्वास हाच मोठा साथीदार आहे . आणि तो तुमचा तो तुमच्या सरावानेच विकसित होणार आहे .

2) बुद्धिमत्ता व अंकगणित –
या घटकाचे महत्त्वाचे मुद्दे एकाच गोष्टीशी संबंधित आहेत आणि ती गोष्ट म्हणजे सराव !सराव !! सराव !!!आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत ,प्रश्नांचा बदलत जाणरा trend , कोणत्या घटकाला किती आणि कसं महत्त्व दिले ते पहा .प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण आणि प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आलेले या घटकांचे प्रश्न सोडवणे. सरावासाठी R S Agrawal हा उत्तम पर्याय आहेच पण तो सोडवण्यासाठी खूप संयमाची आवश्यकता आहे .सध्या तर बुद्धिमत्तेचे अनेक प्रश्नही निव्वळ आकलनाच्या आधारेही सोडविता येतात. म्हणून हा घटक कमी गुणांना दिसत असला तरी त्याचीही महत्त्वही अनन्यसाधारण आहे.

3) निर्णयक्षमता –
या घटकाचे प्रयोजन तुम्ही निर्णय घेऊ शकता की नाही हे तपासणे नसून कोणत्या पदावर राहून कसा आणि कोणता विचार करता हे तपासणे आहेच .आपली भूमिकाही प्रशासन व सामान्य जनता यांच्यामधील दुवा म्हणून पाहण्याची आहेत यासाठी चार गोष्टींचा विचार करावा. त्याम्हणजे —
१.तुमची भूमिका कोणती आहे ? ( Role )
२.परिस्थिती काय दिलेली आहे ? ( Situation )
३.कोणत्या भागाशी संबंधित आहेत ? ( Area )
४.घेतलेल्या निर्णयाचा परिणाम कोणावर होणार आहे? ( Effect )

थोडक्यात परंतु अंतिम महत्त्वाचे काही मुद्दे –
१ . उतारा काळजीपूर्वक वाचला आहे सर्व संपूर्ण समजले आहे म्हणून सर्वच प्रश्न सोडवले गेलेच पाहिजे असा अट्टहास करु नका . एखादा प्रश्न सोडला तरीही चालेल .

२ . प्रश्न काळजीने लक्षपूर्वक वाचावा . म्हणजे काय विचारले आहे ते समजून घ्या . अयोग्य , अचूक , फक्त , केवळ हे शब्द विशेष अधोरेखीत करा . मग विधाने वाचा . प्रत्येक विधानाला स्वतंत्रपणे विचारात घ्या . ते चूक आहे की , बरोबर ते तिथेच ठरवा आणि अंतिम पर्याय निवडा .

३ . कोणताही उतारा पूर्णपणे सोडू नका . उतारा वाचताना तो अवघड वाटत असला तरी आपण २ – ३ प्रश्न नक्कीच सोडवू शकतो . म्हणून तो वाचायचाच .

४ . अनेकदा एखाद्या उताऱ्यावर आपण गरजेपेक्षा जास्त वेळ रेंगाळतो . त्यामुळे पुढचे वेळेचे आपले गणित चूकते . म्हणून अशा चूका करायचे टाळा .

५. पेपर चे कोणतेही नियोजन करण्याआधी पेपर हातात आला की तो दोन-तीन मिनिटांत पूर्ण पहा नेहमीप्रमाणेच असेल तर नियोजनाची अंमलबजावणी करा परंतु वेगळा असेल तर

First plan out Your Strategy then work out Your Plan…

या सर्व बाबी आपण लक्षात घेतल्या तर एक गोष्ट ठळकपणे स्पष्ट होते की , पूर्व परीक्षा पास करायचीच असेल तर CSAT आणि त्यामध्येही उताऱ्यांना काहीच पर्याय नाही . त्यामुळे वर्षभर ज्याच्या मागे आपण अविरतपणे पळत असतो तो GS थोडासा मनातून डोक्यातून बाजूला सारुन निखळ , स्पष्ट विचारहीन मन आणि बुद्धी यांचा समतोल ताळमेळ साधणे गरजेचे आहे . वेळेत सराव करणे , वेळेचे योग्य नियोजन करणे , Accuracy चे शिखर गाठणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आणि जितकं सांगितले आहे , त्यावरच भर देणे हेच CSAT चे खरे सूत्र आहे .

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...