Friday, 24 January 2020

मिस युनिव्हर्स 2019: झोजिबिनी टुंझी (दक्षिण आफ्रिका)

दक्षिण आफ्रिकेच्या झोजिबिनी टुंझी हिने यंदाचा ‘मिस युनिव्हर्स 2019’ म्हणजेच विश्वसुंदरीचा किताब जिंकला आहे.

मिस प्युर्टो रिको हिने द्वितीय क्रमांक तर मिस मेक्सिकोने तृतीय क्रमांक पटकावले.

अमेरिकेच्या अॅटलांटा शहरात 9 डिसेंबर 2019 रोजी 68 वी ‘मिस युनिव्हर्स’ ही सौंदर्य स्पर्धा झाली. गतवर्षीची मिस युनिव्हर्स कॅटरिना ग्रे हिने मानाचा मुकूट विजेतीला चढविला.

उपांत्य फेरीत पोहचलेली भारताची वर्तिका सिंग शेवटच्या 20 जणींमध्ये होती.

स्पर्धेविषयी

मिस युनिव्हर्स (विश्वसुंदरी) ही दरवर्षी घेतली जाणारी एक जागतिक सौंदर्य स्पर्धा आहे.

अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात मुख्यालय असलेली मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन ह्या स्पर्धेचे आयोजन करते.

1952 साली कॅलिफोर्नियामध्ये ही सौंदर्य स्पर्धा सर्वप्रथम भरवली गेली होती.

विश्वसुंदरी ठरलेल्या भारतीय - सुष्मिता सेन (सन 1994) व लारा दत्ता (सन 2000)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...