Tuesday, 7 January 2020

14 वैज्ञानिकांना भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ मिळाली

नाविन्यपूर्ण संशोधनाच्या कल्पना असलेल्या प्रकल्पांमध्ये सहभाग आणि संबंधित शाखांमधल्या संशोधन आणि विकास कार्यावर प्रभाव पाडण्याची क्षमता असलेल्या 14 वैज्ञानिकांना 2018-19 या वर्षासाठी भारत सरकारची ‘स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती’ (फेलोशिप) देण्यात आली आहे.

▪️पाठ्यवृत्ती मिळविणारे

▪️डॉ. शीतल गंडोत्रा (CSIR-IGIB, दिल्ली)

▪️डॉ. जितेंद्र गिरी (नेशनल इन्स्टिट्यूट ऑफ प्लांट जीनोम रिसर्च)

▪️डॉ. राकेश सिंग लैशराम (राजीव गांधी बायोटेक्नॉलॉजी सेंटर, तिरुवनंतपुरम)

▪️डॉ. विशाल राय (IISER, भोपाळ)

▪️डॉ. कनिष्क विश्वास (जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर एडवांस्ड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू)

▪️डॉ. गोपालन राजारामन (IIT मुंबई)

▪️डॉ. अपूर्वा खरे (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. महेंदर सिंग (IISER, मोहाली)

▪️डॉ. सबिमल घोष (IIT मुंबई)

▪️डॉ. स्मरजित करमाकर (TIFR हैदराबाद)

▪️डॉ. अर्जुन बागची (IIT कानपूर)

▪️डॉ. अनिंद्य दास (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. योगेश सिम्हान (IISc बेंगळुरू)

▪️डॉ. श्वेता अग्रवाल (IIT चेन्नई)

▪️स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना

- देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त केंद्र सरकारने स्वर्ण जयंती पाठ्यवृत्ती योजना सुरु केली होती. या योजनेच्या अंतर्गत निवडक युवा वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात मूलभूत संशोधनासाठी विशेष मदत पुरवली जाते.

- पाठ्यवृत्ती आणि संशोधनासाठी निवडण्यात आलेल्या वैज्ञानिकांना विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून मदत दिली जाते. संशोधनासाठी दरमहा 25 हजार रुपये पाठ्यवृत्तीचा यात समावेश आहे. तसेच वैज्ञानिकांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त 5 वर्षांसाठी वार्षिक 5 लक्ष रुपये एवढे संशोधन अनुदान देखील दिले जाते.
-----------------------------------------------

No comments:

Post a Comment

Latest post

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम ― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठ...