1) ‘आम्ही भारतीय नागरिक भारताशी प्रामाणिक आहोत’ या वाक्याती उद्देश ओळखा.
1) आम्ही भारतीय नागरिक 2) भारतीय नागरिक
3) आज भारताशी 4) प्रामाणिक आहोत
उत्तर :- 1
2) ‘तो प्रसंग अत्यंत हदयद्रावक होता’ – या वाक्यातील प्रयोग ओळखा.
1) भावे प्रयोग 2) सकर्मक कर्तरी प्रयोग
3) कर्मणी प्रयोग 4) अकर्मक कर्तरी प्रयोग
उत्तर :- 4
3) पुढील शब्दाचा समास ओळखा – ‘अनंत’
1) नत्र बहुव्रीही समास 2) व्दिगू समास
3) समाहार व्दंव्द – समास 4) मध्यमपदलोपी समास
उत्तर :- 1
4) ‘बापरे .................. केवढा ‘मोठा हा साप’ या वाक्यात गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल ?
1) पूर्णविराम 2) उद्गारवाचक चिन्ह
3) अर्धविराम 4) प्रश्नचिन्ह
उत्तर :- 2
5) ‘ज-स-ज-स-य-ल-ग’ हे खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत ?
1) मंदाक्रांता 2) वसंततिलका
3) शिखरिणी 4) पृथ्वी
उत्तर :- 4
6) या टोपीखाली दडलंय काय?
1) उभयान्वयी अव्यय 2) शब्दयोगी अव्यय
3) क्रियाविशेषण अव्यय 4) केवलप्रयोगी अव्यय
उत्तर :- 2
7) ‘मरावे परी किर्तीरुपे उरावे !’ या वाक्यातील ‘परी’ या शब्दाने कोणते उभयान्वयी अव्यय सुचित होते.
1) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय 2) न्युनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
3) स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय 4) उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय
उत्तर :- 2
8) केवलप्रयोगी अव्ययांचे एकूण प्रकार किती ?
1) सात 2) आठ
3) नऊ 4) दहा
उत्तर :- 3
9) खालील वाक्यातील काळ ओळखा.
‘मधू लाडू खात जाईल’
1) साधा भविष्यकाळ 2) अपूर्ण भविष्यकाळ
3) पूर्ण भविष्यकाळ 4) रीती भविष्यकाळ
उत्तर :- 4
10) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – विदुषी
1) पुल्लिंगी 2) नपुंसकलिंगी
3) स्त्रीलिंगी 4) यापैकी नाही
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment