1) खालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
1) पाटील 2) सोमवार 3) श्रीमंत 4) पौरुषत्व
उत्तर :- 4
2) ‘हा-ही-हे’, ‘तो-ती-ते’, ही कोणत्या सर्वनामाची उदाहरणे होत ?
1) सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे 2) संबंधी सर्वनामे
3) प्रश्नार्थक सर्वनामे 4) दर्शक सर्वनामे
उत्तर :- 4
3) अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार ओळखा.
‘राम एकवचनी राजा होता.’
1) नामसाधित क्रियापद 2) प्रयोजक क्रियापद
3) सर्वनामिक क्रियापद 4) समासघटित विशेषण
उत्तर :- 4
4) अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा.
मला आता काम करवते.
1) शक्य क्रियापद 2) भावकर्तृक क्रियापद
3) अनियमित क्रियापद 4) साधे क्रियापद
उत्तर :- 1
5) क्रियाविशेषण अव्यये ही :
अ) क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतात. ब) क्रियाविशेषण विकारी असतात.
क) एका वाक्याची दुस-या वाक्याशी सांगड घालतात.
1) फक्त अ बरोबर 2) फक्त क बरोबर
3) अ आणि ब बरोबर 4) अ आणि क बरोबर
उत्तर :- 3
6) अचूक विधाने निवडा.
अ) च, ना, पण, मात्र हे शब्द शब्दयोगी अव्यये आहेत.
ब) च, ना, पण, मात्र हे कैवल्य वाचक शब्दयोगी अव्यये आहेत.
1) फक्त अ अचूक 2) फक्त ब अचूक
3) दोन्ही अचूक 4) दोन्ही चूक
उत्तर :- 3
7) उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा. – ‘विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली.’
1) विकल्पबोधक 2) समुच्चयबोधक
3) न्युनत्वबोधक 4) परिणामबोधक
उत्तर :- 2
8) चुप, चिंग, गप, गुपचित, बापरे
वरीलपैकी किती मौनदर्शक अव्यये आहेत.
1) चार 2) पाच 3) तीन 4) एक
उत्तर :- 1
9) ‘मी निबंध लिहितो’ अपूर्ण भविष्यकाळ करा.
1) मी निबंध लिहिला 2) मी निबंध लिहित जाईन
3) मी निबंध लिहित असेन 4) वरील एकही पर्याय योग्य नाही
उत्तर :- 3
10) ‘विव्दान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.
1) पंडिता 2) विदुषी 3) हुषार 4) यापैकी काहीही नाही
उत्तर :- 2
No comments:
Post a Comment