Monday 25 October 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) मुसळधार    2) पाऊस   
   3) पडला    4) पाऊस पडला

उत्तर :- 1

2) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
     ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’

   1) कर्मभाव संकर प्रयोग    2) मिश्र किंवा संकर प्रयोग
   3) भावकर्तरी प्रयोग    4) कर्म – कर्त प्रयोग

उत्तर :- 3

3) पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ................... समास होतो.

   1) बहुव्रीही    2) कर्मधारय   
   3) व्दिगू    4) व्दंव्द

उत्तर :- 3

4) कंसातील विरामचिन्हे ओळखा. (;)

   1) अपूर्ण विराम    2) स्वल्प विराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

5) पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे ?

   1) आसू    2) खर्च     
   3) आंबा    4) परशू

उत्तर :- 2

6) ‘व्यंगार्थ’ वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.

   1) आम्ही  फक्त बाजरीच खातो.
   2) देविकाबाई सुनेला म्हणाल्या, ‘सूर्य अस्ताला गेला.’
   3) घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल.
   4) त्याच्या घरावरून गेले, की मंदिर येते.

उत्तर :- 2

7) खालीलपैकी कोणता शब्द ‘किंमत’ या अर्थाचा नाही ?

   1) मूल      2) दर्जा     
   3) भाव    4) दर

उत्तर :- 2

8) दिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा. – कृश

   1) स्थूल    2) नैसर्गिक   
   3) गोरा    4) दोष

उत्तर :- 1

9) ‘हाजीर तो वजीर’ या म्हणीचा अचूक पर्याय पुढीलपैकी कोणता  ?

   1) बुध्दिबळाच्या खेळात ‘वजिराला’ महत्त्व असते    2) जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो
   3) ‘वजीर’ छान चित्रपट असतो        4) हजेरी बुकात नाव नोंदवणे

उत्तर :- 2

10) ‘तोंडात बोट घालणे’ – या वाक्प्रचाराच अर्थ ओळखा.

   1) भूक लागणे      2) शरण येणे   
   3) नवा हरूप येणे    4) आश्चर्यचकीत होणे

उत्तर :- 4

1 comment:

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...