1) पर्यायी उत्तरांतील ‘उद्गारवाचक वाक्य’ ओळखा.
1) ही मूर्ती खूप सुंदर आहे. 2) कोण म्हणतो ही मुर्ती सुंदर नाही.
3) किती सुंदर आहे ही मूर्ती 4) ही मूर्ती सुंदर नाही असे नाही.
उत्तर :- 3
2) खाली दिलेल्या वाक्याचे साध्या वर्तमानकाळातील रूप शोधा. – मी आंबा खाईन.
1) मी आंबा खातो 2) मी आंबा खाल्ला
3) मी आंबा खात असेन 4) मी आंबा खात होती
उत्तर :- 1
3) खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर पुल्लिंग व स्त्रीलिंग अशा दोन्ही प्रकारे होतो.
1) संधी 2) बाधी
3) वेळ 4) सर्व
उत्तर :- 4
4) गोविंदा इंग्रजीत कच्चा आहे. – अधोरेखित शब्दाचा कारकार्थ शोधा.
1) षष्ठी – अपादान 2) सप्तमी – अधिकरण
3) तृतीया – अधिकरण 4) पंचमी – अपादान
उत्तर :- 2
5) ‘वारा सुटला आणि पाऊस गेला’ या वाक्याचा प्रकार कोणता ?
1) केवल वाक्य 2) संयुक्त वाक्य
3) मिश्र वाक्य 4) साधारण वाक्य
उत्तर :- 2
6) ‘अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही’ या वाक्यातील उद्देश कोणते?
1) अलीकडे 2) तुम्हाला
3) मी 4) पत्र
उत्तर :- 3
7) ‘न्यायधिशाकडून दंड करण्यात आला’ या प्रयोगाचे नाव सांगा.
1) कर्तरी प्रयोग 2) भावे प्रयोग
3) समापन कर्मणी प्रयोग 4) नवीन कर्मणी प्रयोग
उत्तर :- 4
8) ‘तोंडी लावणे’ हा सामासिक शब्द समासाचा कोणत्या प्रकारातील आहे ?
1) उपपदतत्पुरुष 2) अलुक तत्पुरुष
3) कर्मधारय 4) व्दिगू
उत्तर :- 2
9) कंसातील विरामचिन्हे ओळखा. - (:)
1) स्वल्पविराम 2) अपूर्ण विराम
3) अर्धविराम 4) यापैकी नाही
उत्तर :- 2
10) खालीलपैकी कोणता शब्द देशी शब्द नव्हे ?
1) दगड 2) धोंडा
3) पाषाण 4) झाड
उत्तर :- 3
No comments:
Post a Comment