1) पर्यायी उत्तरांतून योग्य ते उत्तर सांगा? ‘ईश्वरनिर्मित’
1) नत्रतत्पुरुष समास 2) तृतीया तत्पुरुष समास
3) प्रादी समास 4) कर्मधारय समास
उत्तर :- 2
2) बोलणा-याच्या तोंडचे शब्द सूचित करण्यासाठी कोणत्या चिन्हाचा वापर करतात ?
1) एकेरी अवतरण (´ ´) 2) दुहेरी अवतरण (“ ”)
3) उद्गार चिन्ह ( ! ) 4) स्वल्प विराम ( , )
उत्तर :- 2
3) ‘अणूरेणूहून थोकडा | तुका आकाशा एवढा’ यातील अलंकार ओळखा.
1) चेतनगुणोक्ती 2) भ्रांतिमान 3) विरोधाभास 4) सार
उत्तर :- 3
4) अभ्यस्त शब्द ओळखा.
1) बारीक सारीक 2) बारकुडा 3) बारकावा 4) बारावा
उत्तर :- 1
5) ‘गंगेत गवळयांची वसती’ या वाक्यात कोणती शब्दशक्ती आहे ?
1) अभिधा 2) लक्षणा 3) व्यंजना 4) योगरूढ
उत्तर :- 2
6) ‘देवाज्ञा होणे’ – म्हणजे
1) साक्षात्कार होणे 2) देव पावणे
3) अवतार घेणे 4) मृत्यू पावणे
उत्तर :- 4
7) ‘गर्भ गळीत होणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
1) भयभीत होणे 2) गर्भ गळणे
3) गर्भ पाडणे 4) घाबरून जाणे
उत्तर :- 4
8) खालील शब्द समूहाचा समूह दर्शक शब्द लिहा.
‘जाणून घेण्याची इच्छा असणारा’
अ) हुशार ब) जिज्ञासू क) अभ्यासू ड) जागृत
1) अ आणि ब बरोबर इतर सर्व चूक 2) ब बरोबर इतर सर्व चूक
3) ब आणि क बरोबर इतर सर्व चूक 4) ड बरोबर इतर सर्व चूक
उत्तर :- 2
9) पुढीलपैकी अशुध्द शब्द कोणता ?
1) प्रतीक 2) बंदूक
3) कुराड 4) गूढ
उत्तर :- 3
10) खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक नाही ?
1) न 2) ण 3) ड्. 4) ज्ञ
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment