1) उपसर्ग साधित शब्द निवडा.
1) मोफत 2) बंदिस्त 3) पैठणी 4) भरजरी
उत्तर :- 4
2) मी आता मुक्याचे व्रत सोडणार नाही. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
1) अभिधामूल व्यंजना 2) लक्षणामूल व्यंजना
3) लक्षण लक्षणा 4) सारोपा लक्षणा
उत्तर :- 1
3) खालीलपैकी कोणता शब्द ‘घर’ या अर्थाचा नाही ?
1) सदन 2) गृह 3) गोठा 4) गेह
उत्तर :- 3
4) पर्यायी उत्तरातील ‘अ’ व ‘ब’ या शब्दगटातून विरुध्द अर्थी शब्द जोडी कोणती ती शोधा.
अ ब
1) अश्व वाजी
2) हय घोडा
3) अनुज अग्रज
4) वारू तुरंग
उत्तर :- 3
5) गाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा. – अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले. पण तरीही त्यांना
स्वत:ला सावरले. कारण म्हणतात ना ..............
1) वळणाचे पाणी वळणावरच जाणार 2) शीर सलामत तर पगडी पचास
3) शेंडी तुटो वा पारंबी तुटो 4) पदरी पडले पवित्र झाले
उत्तर :- 2
6) ‘ज्येष्ठ नागरिकांचा आदर करा.’ नकारार्थी वाक्य बनवा.
1) ज्येष्ठ नागरिकांचा मान राखा 2) ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करू नका
3) ज्येष्ठ नागरिकांना आदराने वागवा 4) ज्येष्ठ नागरिकांचा अनादर करू नका
उत्तर :- 4
7) ‘शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो’ या वाक्यातील ‘विधानपूरक’ ओळखा.
1) शरद 2) चांदणे
3) गुलमोहर 4) मोहक
उत्तर :- 4
8) ‘रामाकडून रावण मारला गेला.’ या प्रयोगाचे नाव सांगा ?
1) कर्तरी प्रयोग 2) कर्मणी प्रयोग
3) भावे प्रयोग 4) संकीर्ण प्रयोग
उत्तर :- 2
9) ‘मीठभाकर’ या समाहार व्दंव्द समासाचा विग्रह कसा आहे ?
1) मीठ किंवा भाकरी 2) मीठ घालून केलेली भाकरी
3) मीठ, भाकरी व तत्सम पदार्थ 4) भाकरी आणि मीठ
उत्तर :- 3
10) खालील वाक्याच्या शेवटी योग्य विरामचिन्ह निवडा. – केवढी शुभवार्ता आणलीस तू
1) , 2) .
3) ? 4) !
उत्तर :- 4
No comments:
Post a Comment