२६ डिसेंबर २०१९

CSAT ची तयारी कशी करावी

मित्रांनो....
      राज्यसेवा (पूर्व) परीक्षेच्या जाहिरातीतील वर्ग -1 व  वर्ग-2 ( class 1 व class 2) या पदांची एकूण 200 पदे ही संख्या विचारात घेता आणि गेल्या वर्षीच्या पूर्व परीक्षेचा cut of  पाहता 250 + मार्क्स किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्सचे Target ठेवणे गरजेचे आहे ... त्यामुळे GS 110 + 140 CSAT = 250 मार्क्सचे टार्गेट ठेवावेच लागेल... तरच Safe Zone मध्ये असू.. कारण काठावर (Boundary line) वर असणारे पब्लिक कधीही Mains चा स्टडी prelims नंतर लगेच सुरू करत नाहीत, result ची वाट पाहतात .. आणि त्यामुळे Mains चा study उरलेल्या कालावधीत result oriented होत नाही... म्हणून prelims ला 250 + चे टार्गेट ठेवून अभ्यास सुरू करा...

★ CSAT Paper कसा सोडवावा :--

● 1) प्रथम --- Comprehension
● 2)  Decision Making
● 3) Reasoning + Maths
  
★ ----  D.M. प्रथम घेतल्यास आपणाकडून चुकून जास्त वेळ दिला जातो.. मात्र Comprehension नंतर सोडवल्यास comphn सोडवताना एक speed maintain झालेला असतो , grasping वाढलेली असते. त्यामुळे खूप कमी वेळात(5 मिनिटात) हे 5 प्रश्न सोडवले जातात.. (हा एक Psychological Effect आहे).. D. M. ला जवळपास 10 मार्क्स मिळायला हवीत

★ Comprehension ;--- 
सर्वात Best Method म्हणजे  पाठीमागील सर्व Question Papers (सन 2013 ते 2019) झेरॉक्स करून त्या उताऱ्यांचा अभ्यास करा...किंवा एखादे CSAT विश्लेषण चे दर्जेदार पुस्तक अभ्यासणे..  आयोगाची प्रश्न विचारण्याची पद्धत व उत्तर निवडण्यातील अचूकता याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे ... प्रश्न व उत्तरातील  key words , योग्य-अयोग्य पद्धत ..  यांचा नीट अभ्यास करणे गरजेचे आहे... कारण Mpsc च्या उताऱ्याचा दर्जा व बाजारात उपलब्ध असणाऱ्या पुस्तकांच्या दर्जात नक्कीच थोडा फार फरक आहे... Comprehension हे उगीच जास्त अवघड करून शिकू नका.. सोप्या शब्दात शिका , अभ्यासा.... अचूक उत्तरे शोधण्याच्या technique शिका.. त्यामुळे practice खूप महत्त्वाची आहे.

★ Reasoning + Maths :-( बुद्धिमत्ता + गणित )

● ----  बुद्धिमत्तेची पुस्तके सोडवण्यापेक्षा उत्तरासह वाचा.. खूप वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास झाला पाहिजे.. प्रश्न विचारण्याच्या जास्तीत जास्त possibilities चा अभ्यास झाला  पाहिजे ...( Pass होण्यासाठी सोप्या पुस्तकांचे इथे काम नाही..परीक्षेत काही प्रश्न अर्ध्या page चा एक असा असतो, आणि ते प्रश्न सोडून देणे परवडणारे नसते त्यामुळे त्याचा सराव करा ..
..... ( कारण प्रत्येक परीक्षेत फक्त 3 ते 4 च Quality base प्रश्नांवर तुम्ही Pass होणार की Fail हे ठरणार आहे..)

●---- गणित :--  परीक्षेत प्रत्येक प्रश्न 2.5 मार्क्स चा असतो त्यामुळे गणिताचा प्रश्न हा सरळ न विचारता 2 ते 3 प्रश्नांना एकत्र करून twist करून विचारलेला असतो.. गणिताचा अभ्यास करताना दर्जेदार पुस्तके वापरा (समाधानासाठी सोपी पुस्तके वाचू नका.. ) विविध Type चे प्रश्न सोडवून दिलेली पुस्तके वाचा...  एकाच step मध्ये हे प्रश्न कसे सोडवता येतील याचा सराव करा.. कारण मार्क्स बरोबर आपल्याला Time ही वाचवता आला पाहिजे.. बऱ्याच मुलांचा वेळेत पेपर पूर्ण होत नाही. आणि Attempt कमी दिसल्यामुळे घाबरून जाऊन गोंधळलेल्या मनस्थितीत अचूक उत्तरे शोधू शकत नाही..
( Time Mgt साठी किमान 2 तरी Test Papers सोडवून पहा ).. गणित व बुद्धिमत्ते च्या 25 प्रश्नांपैकी 22+ प्रश्न बरोबर कसे येतील याकडे लक्ष द्या.. पास च्या यादीत आपला नंबर हवा.. त्यासाठी योग्यरीतीने प्रयत्न करा..

17 व्या लोकसभेत महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या

🌸17व्या लोकसभेत देशभरातील विविध पक्षांमधून 78 महिला खासदार दिसणार आहेत. आतापर्यंतची ही महिला खासदारांची सर्वात मोठी संख्या आहे.

🌸 उत्तर प्रदेश आणि पश्‍चिम बंगाल येथून प्रत्येकी 11 महिला लोकसभेवर निवडून गेल्या आहेत.

🌸 एकूण 724 महिलांनी ही निवडणूक लढवली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक 54 उमेदवार दिले. त्यापाठोपाठ भाजपचे 53 महिला उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरले होते.

🌸1952 पासूनचा हा महिलांचा सर्वात मोठा म्हणजे लोकसभेच्या एकूण जागांच्या 14% सहभाग लोकसभेत असणार आहे.

🌸 मावळत्या म्हणजेच 16व्या लोकसभेत 64 महिला खासदार होत्या.

🌸15व्या लोकसभेत 52 महिलांनी आपल्या भागाचे प्रतिनिधित्व केले होते.

🌸 दरम्यान महिलांना राजकारणात 33% प्रतिनिधित्व देण्याचे विधेयक संसदेत अजूनही प्रलंबित आहे.

🌸 41 महिला खासदारांपैकी 27 खासदारांना यावेळी आपले स्थान अबाधित राखण्यात यश आले.

🌸 या खेपेस उत्तर प्रदेशातून सर्वाधिक 104 महिला उमेदवारांनी लोकसभेसाठी आपले नशीब आजमावले. त्यापाठोपाठ महाराष्ट्र आणि तामिळनाडूतून 64 महिला उमेदवार रिंगणात होत्या. बिहार 55, पश्‍चिम बंगाल 54 अशा महिलांनी ही निवडणूक लढवली.

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धात मनूला दुहेरी सुवर्णपदके

🔰मनू भाकरने राष्ट्रीय अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांमध्ये सुवर्णपदके जिंकण्याची किमया साधली.

🔰तर 17 वर्षीय मनूने वरिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 243 गुण मिळवले, तर कनिष्ठ गटाच्या अंतिम फेरीत 241 गुण मिळवले.

🔰युवा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मनूने पात्रता फेरीत 588 गुण मिळवले.
वरिष्ठ गटात देवांशी धामाने रौप्य आणि यशस्वी सिंग देशवालने कांस्यपदक पटकावले.

🔰मनू आणि यशस्वी यांनी 2020च्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील स्थाने आधीच पक्की केली आहेत.

आता राष्ट्रीय लोकसंख्या सूची अद्ययावत करण्याचा संकल्प

◾️केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय; एप्रिलपासून अंमलबजावणी

◾️सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीविरोधातील जनक्षोभ कायम असताना केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर)अद्ययावत करण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.

◾️ त्यासाठी ३,९४१.३५ कोटींच्या तरतुदीस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

◾️देशात
📌 सहा महिने वास्तव्यास असलेल्या, तसेच
📌सहा महिने वास्तव्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाची नोंद ‘एनपीआर’मध्ये ठेवण्यात येणार आहे.

◾️ राष्ट्रीय लोकसंख्या सूची अद्ययावत करण्यास सर्व राज्यांनी अनुकूलता दर्शवली असून, त्यासंदर्भात अधिसूचनाही काढली आहे. शिवाय, हजारो कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षणही सुरू झाले आहे, असे जावडेकर म्हणाले.

◾️राष्ट्रीय लोकसंख्या सूची ही जनगणनेचा भाग असून,
📌ती १ एप्रिल ते ३० सप्टेंबर २०२० या काळात केली जाणार आहे.

◾️त्यासाठी अ‍ॅपचा वापर केला जाणार असून, त्यावर प्रत्येकाने आपली माहिती भरायची आहे.

◾️ या माहितीसाठी कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज नाही. बायोमेट्रिकचाही वापर केला जाणार नाही.

◾️केंद्र सरकारने एकूण १३ हजार कोटींची तरतूद केली असून, त्यांपैकी 📌जनगणनेसाठी ८,७५० कोटी तर, 📌‘एनपीआर’साठी ३,९४१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

📚✍ २०१० मध्ये सुरुवात

◾️२०११ च्या जनगणना अभियानाआधी राष्ट्रीय लोकसंख्या सूची (एनपीआर) करण्यात आली होती.

◾️त्यानंतर २०१५ मध्ये घरोघरी जाऊन ‘एनपीआर’ अद्ययावत करण्यात आली.

◾️आता संगणकीकरण पूर्ण झाल्यामुळे दुसऱ्यांदा नोंदणी अद्ययावत केली जात असून, अ‍ॅपचा वापर केला जात आहे.

◾️या नोंदणीत व्यक्तीची💢 २१ प्रकारची माहिती गोळा केली जाईल.

◾️नाव, विद्यमान व त्यापूर्वीच्या निवासाचा पत्ता, व्यवसाय, शिक्षण, आधार क्रमांक, पॅन क्रमांक, निवडणूक ओळखपत्र, चालक परवाना क्रमांक, मोबाइल क्रमांक अशी अनेक प्रकारची माहिती गोळा केली जाणार आहे.

◾️सहा महिने देशात वास्तव्य असणाऱ्या प्रत्येकाला नोंदणी सक्तीची
माहिती अ‍ॅपद्वारे भरणे आवश्यक असून, कोणत्याही कागदपत्रांची गरज नाही
व्यक्तीची २१ प्रकारची माहिती गोळा करण्यात येईल.

📚✍ केरळ, पश्चिम  बंगालचा विरोध

◾️राष्ट्रीय लोकसंख्या सूची म्हणजे मागच्या दाराने केलेली नागरिक नोंदणी असल्याचा आरोप केरळ आणि पश्चिम बंगाल सरकारने केला आहे. या प्रक्रियेस स्थगिती देण्याचा निर्णय या राज्यांनी घेतला आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √
विष्णुशास्त्री चिपळूणकर
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
छत्रपती शाहू महाराज

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?

संत तुकाराम
संत सावतामाळी
संत नरहरी सोनार
संत नामदेव.   √

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड
दादोबा पांडुरंग
बाळशास्त्री जांभेकर
नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस
कापूस
भात
नीळ.   √

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √
अनेक संस्थाने खालसा करणे
ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 
विनोबा भावे.    √
सरदार वल्लभभाई पटेल 
मौलाना आझाद

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?

विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली
साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत
साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √
विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे
ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे
वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √
निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √
लाला लजपतराय
लाला हरदयाळ
महात्मा गांधी

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √
डॉ. राधाकॄष्णन
डॉ. आंबेडकर
डॉ. झाकीर हुसेन

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √
कुसूम
कंडोल
शलार्इ

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √
दमास्कस
तेल अवीव 
तेहरान 

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड
मंगोलाइड .  √
बुश मॅनाइड 
ऑस्ट्रेलोंइड

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर
वज्रेश्र्वरी.  √
गणपतीपुळे
संगमेश्र्वर

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 
काळी जमीन.   √
तांबडी जमान
रेताड जमीन

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव
कोर्इमतूर
कानपूर
मांजरी.   √

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली
चेन्नर्इ
मुंबर्इ.   √
हैद्राबाद

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र
केरळ .  √
प. बंगाल
तमिळनाडू

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई
दिल्ली.   √
मद्रास 
बंगलोर

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √
बंगालचा उपसागर  
हिंदी महासागर   
पॅसिफिक महासागर

Super 30 Questions Current Affairs


1.   कोणत्या दिवशी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो?
✅.  23 डिसेंबर

2.  कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय गणित दिन’ साजरा केला जातो?
✅.  22 डिसेंबर

3.   "हेल्थ अँड वेल बीइंग इन लेट लाइफ: पर्स्पेक्टिव्ह्ज अँड नॅरेटीव्ह्ज फ्रॉम इंडिया" पुस्तकाचे लेखक कोण?
✅.  प्रसून चटर्जी

4.  कोणत्या ठिकाणी जंगलाचे सर्वात प्राचीन जीवाश्म सापडले?
✅.   न्यूयॉर्क

5.    अंतराळ तंत्रज्ञानाच्या संदर्भात असलेले ‘CBERS-4A’ हे काय आहे?
✅.   चीन आणि ब्राझिल यांचा उपग्रह

6.   कोणत्या संस्थेनी पुणे या शहरात ‘वॅक्सिनेशन ऑन व्हील्स’ क्लिनिकचा शुभारंभ केला?
✅.   IIT हैदराबाद

7.   ‘जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन’ या कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
✅.  देवेश श्रीवास्तव

8.   ‘प्रवेशयोग्य निवडणुका’ विषयक राष्ट्रीय कार्यशाळा कोठे पार पडली?
✅.  नवी दिल्ली

9.   कोणत्या संघटनेनी ICC सोबत महिला सक्षमीकरणाबाबत भागीदारीची घोषणा केली?
✅.  संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

10.   "टर्ब्युलंस अँड ट्रायम्फ - द मोदी इयर्स" या पुस्तकाचे लेखक कोण?
✅.   राहुल अग्रवाल

11.  कोणत्या देशाच्या अंतराळ स्थानकावरून इथियोपिया या देशाने त्यांचा पहिला उपग्रह प्रक्षेपित केला?
✅.  चीन

12.   कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव एकात्मता दिवस साजरा केला जातो?
✅.  20 डिसेंबर

13.  कोणत्या राज्याने ‘जलसाथी’ नावाने एका महत्वाकांक्षी कार्यक्रमाला सुरुवात केली?
✅.   ओडिशा

14.   डिसेंबर 2019 मध्ये कोणत्या बँकिंग कंपनीने 100 अब्ज डॉलर एवढ्या बाजार भांडवलाचा टप्पा ओलांडला?
✅.  HDFC

15.  भारतीय नौदलाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या अपहरण-रोधी सरावाचे नाव काय आहे?
✅.  अपहरण

16.   कोणत्या देशाने ‘गांधी नागरिकत्व शिक्षण पुरस्कार’ देण्याची घोषणा केली?
✅. पोर्तुगाल

17.   भारताचे ‘पिनाका’ क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारे मारा करते?
✅.    पृष्ठभागावरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र

18.  आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने नव्याने शोधलेल्या एका तार्‍याचे नाव काय ठेवले?
✅.  शारजाह

19.   63 व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर रायफल प्रकारात कोणी सुवर्णपदक जिंकले?
✅.  झीना खिट्टा

20.   कोणत्या दिवशी ‘गोवा मुक्ती दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 19 डिसेंबर

21.  अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन या कंपनीने सीईओ कोण आहेत?
✅.  रिचर्ड व्हेंट्रे

22.   ‘स्ट्रँडहॉग’ हे काय आहे?
✅. ऑपरेटिंग सिस्टममधला बग

23.   2024 पॅरिस ऑलम्पिकमधल्या ‘सर्फिंग’ स्पर्धेचे आयोजन कोणत्या बेटावर केले जाणार आहे?
✅.   ताहिती

24.  ‘ग्लोबल रिफ्यूजी फोरम’ (GRF) याची प्रथम बैठक कुठे आयोजित केली गेली?
✅.  जिनेव्हा

25.  कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?
✅.  आंध्रप्रदेश

26.  ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम कधी आयोजित केला गेला होता?
✅.  16 डिसेंबर

27.  कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?
✅.  अमिताभ बागची

28.   "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र कुणी लिहिले आहे?
✅.  विश्वनाथन आनंद

29.   कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाले?
✅.   भारत

30.   ‘नॅशनल डिफेन्स कॉलेज’च्या कमांडंट पदी कोणाची नेमणूक झाली?
✅.   डी. चौधरी

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...