🖋आंध्र प्रदेशात भविष्यात तीन राजधान्या असू शकतात, विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत.
🖋जगनमोहन रेड्डी यांनी जाहीरनाम्यात केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण, सिंचन आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विभागानुसार राज्याची राजधानी करण्यात येणार असल्याचे संकेत आज (ता.१७) दिले.
🖋राज्याच्या
📌 विशाखापट्टणम,
📌 अमरावती,
📌 कुरनूल या तीन राजधान्या असू शकतात असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
🖋प्रस्तावित विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी नगररचना तज्ज्ञांची असलेली समिती काही दिवसांत अहवाल पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
🖋मुख्यमंत्री म्हणाले, 'तीन राजधान्या करण्याचा विचार आपण करत असून, प्रस्तावित
📌 अमरावती शहरातून विधिमंडळाचे कामकाज चालेल तर,
दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच
📌 कुरनूल येथून न्यायालयीन प्रक्रिया चालेल. तर,
तिसरी राजधानी
📌 विशाखापट्टणम येथून प्रशासकीय खात्याचा कारभार चालेल'. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
🖋जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.
🖋एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती.
🖋 त्याचप्रमाणे राज्याला तीन राजधान्या असण्याची ही पहिलीच वेळ आहे.
📌 अनुसूचित जाती,
📌अनुसूचित जमाती,
📌 मागासवर्ग,
📌अल्पसंख्य आणि
📌 कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता.